शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याखालचा थरार.

By admin | Updated: May 1, 2014 14:54 IST

बोटीने आपण जात असतो. समोर अथांग समुद्र पसरलेला. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. घुंऽऽ घुंऽऽ करीत वारा रोंरावत असतो, एकामागोमाग एक लाटा आपल्या दिशेनं सरकत असतात,

 स्कुबा डायव्हिंग
बोटीने आपण जात असतो. समोर अथांग समुद्र पसरलेला. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. घुंऽऽ घुंऽऽ करीत वारा रोंरावत असतो, एकामागोमाग एक लाटा आपल्या दिशेनं सरकत असतात, बोट पुढे-मागे हेलकावे घेत असते. जोडीला समुद्रावरची ती गाज.. इतरवेळी रोमँटिक वाटणारी ही गाज अशावेळी भयकारी वाटायला लागतेच.
आपल्याला पोहता येत नसतं, बहुधा नसतंच. गुडघाभर पाण्यात स्वीमिंग टँकमध्ये डुबक्या मारणं, दोन-चार हात मारता यायला लागले म्हणजे ‘स्वीमिंग’ यायला लागलं असं वाटायला लागणं आणि ज्याच्या खोलीचा काही थांगपत्ताच लागत नाही, माहीत नाही अशा समुद्राच्या पोटात शिरणं. भीती जाणवतेच.
पोटात अक्षरश: खड्डा पडतो. 
स्कुबा डायव्हिंग करताना समुद्राच्या पोटात शिरून पाण्याखालचं सृष्टीसौंदर्य न्याहाळणं ही गोष्ट हवीहवीशी, थरारक खरीच, पण त्यासाठी काळीजही वाघाचंच हवं.
ज्या ठिकाणी आपल्याला समुद्राच्या पोटात शिरायचंय तिथपर्यंत नेण्यासाठी बोट आपल्याला घेऊन जात असते.
अनेक गोष्टी अगोदरच नजरेसमोर दिसायला लागतात.
लाटांनी हेलकावे खाणारी ही बोट आत्ताच, खरंच इथल्या इथे डुबली तर?
आपला श्‍वास गुदमरून इथेच आपली इतिश्री झाली तर?
सुसर, मगरीसारख्या प्राण्यांनी आपल्याला ओढून नेलं तर? शार्कसारख्या माशांनी खाऊनच टाकलं तर? समुद्राच्या पोटातली जादुई नगरी प्रत्यक्ष पाहण्याआधीच काळीज धडधडायला लागतं.
समुद्राच्या पोटात काही फूट खोल जाऊन तिथली सजीवसृष्टी पाहायची तर त्यासाठी हिंमत हवीच. धाडस हवं, जिगर हवी.
पण एकदा का पाण्याखाली गेलं आणि पाण्यातली मायानगरी अनुभवली, की स्वत:लाही विसरायला होतं. समुद्राच्या पोटात शिरण्याची ही ओढ मग जिवाला स्वस्थ बसू देत नाही.

अनुभव
ट्रेकिंग, माऊन्टेनिअरिंग. अशा अँडव्हेन्चरस अँक्टिव्हिटीजमध्ये मी बर्‍याचदा भाग घेतलाय. नदीत, तलावात अनेकदा डुंबलोय. मला स्वीमिंगही तसं चांगलं येतं, त्यामुळे पाण्याची तशी फार भीती नव्हती.
आमचा मोठा ग्रुप होता. लहान-मोठे १५-२0 जण तरी होतो. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी बोटीनं आम्ही जात होतो. सिंधुदुर्गला समुद्रातून आमची बोट जात होती, पण स्कुबा डायव्हिंगचं ठिकाण जसजसं जवळ येत गेलं, प्रत्येकाच्या काळजातली भीती घट्ट होत गेली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर तर अनेकांनी ‘नाही’च सांगितलं.
माझ्याही पोटात बाकबुक होत होतीच. पण मन घट्ट केलं, भीतीला ढकलून ढकलून सारखं दूर करत होतो. प्रशिक्षकाच्या मदतीनं कॉस्च्युम अंगावर चढवला. मास्क घातला, पाठीवर ऑक्सिजनचं सिलिंडर लटकावलं. 
करावं की नाही, करावं की नाही. छातीत धडधड आणि पोटात फुलपाखरं उडतच होती. शेवटी मारलीच उडी. तेवढाच एक कसोटीचा क्षण. प्रशिक्षक हाताला धरून पाण्यातली ती जादुई नगरी दाखवत होता. जमिनीच्या वर जशी आपली सृष्टी असते, तशीच सारी सृष्टी. पण कितीतरी अधिक सुंदर. रंगबिरंगी. विविध रंगी, विविध आकारांचे मासे, निरनिराळ्या वनस्पती, झाडं, प्रवाळ. तिथल्या कपार्‍या, वेगवेगळ्या जातीच्या माशांची ‘घरं’. सगळंच स्वत:ला विसरायला लावणारं.
माशांबरोबर, त्यांच्यासारखंच आपणही विहार करीत असतो. त्या जादुई मायानगरीत फिरत असतो. एक वेगळीच अनुभूती.
त्या अनुभूतीत मीही दंग होतो. स्वत:ला विसरलो होतो. 
तेवढय़ात. सोबतच्या प्रशिक्षकानं त्याच्या हातातला पाव थोडासा कुस्करला. त्याचे बारीक बारीक कण पाण्यात इतस्तत: विखुरले. आणि.
माशांची भलीमोठी झुंड. हजारो, लाखो मासे आमच्या अवतीभोवती. आमच्या अंगाखाली, वर, आजूबाजूला. सगळीकडे रंगबिरंगी माशांची दुनिया आणि त्यांच्या मध्ये आम्ही. तोंड आऽऽ करून आपल्या इवल्याशा तोंडात, पावाचे ते छोटेसे कण पाहता पाहता ते गट्टम करत होते. त्यांचा स्पर्श जाणवत होता. त्यांना हातात पकडण्याचा प्रयत्न केला, तर सुळ्ळकन निसटूनही जात होते.
स्कुबा डायव्हिंगचा हा माझा पहिलाच अनुभव. पण त्यातला थरार आणि तो अनुभव. अनावर झालं की माझी पावलं समुद्राच्या दिशेनं आपोआप वळायला लागतात.
आतापर्यंत आठ-दहा वेळा मी हा अनुभव घेतलाय. प्रत्येक अनुभव वेगळा आणि प्रत्येक वेळचा तो जलमहालही वेगळा. पाण्यातली ही जादुनगरी मला पुन्हा आता साद घालतेय.
शीतल महाजन (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्कायडायव्हर आणि फिनिक्स स्काय डायव्हिंग संस्थेचे संचालक)