अमेरिकेत राहायचं की परत जायचं? तिथं शिकणाऱ्या मुलांनी करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 03:30 PM2020-07-09T15:30:21+5:302020-07-09T15:38:01+5:30

एकतर तुम्ही विद्यापीठात प्रत्यक्ष शिका, कोरोनाला सामोरे जा आणि ऑनलाइन शिकत असाल तर मायदेशी परत जा, असं अमेरिकन प्रशासनाने सांगितलं; पण्..

trump-admin-says-foreign-students-must-leave-us-if-classes-go-online-what will happen to indian students? | अमेरिकेत राहायचं की परत जायचं? तिथं शिकणाऱ्या मुलांनी करायचं काय?

अमेरिकेत राहायचं की परत जायचं? तिथं शिकणाऱ्या मुलांनी करायचं काय?

Next

- स्वप्नाली बनसोडे,  नॉर्थइस्टर्न विद्यापीठ, बोस्टन 

६ जुलै २०२०ची दुपार अमेरिकेत राहून शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन हादरवणारी ठरली. त्याला कारण ठरला यू एस इमिग्रेशन अँड कस्टम्स  एन्फोर्समेंट (ICE ) विभागाने जाहीर केलेला निर्णय:जर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जर F1 किंवा M1 व्हिसावर असतील, आणि त्यांचे शिक्षण जर १००% ऑनलाईन असेल तर, त्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतून मायदेशी परतावे लागेल किंवा जी विद्यापीठं किंवा कॉलेजेस इन पर्सन(प्रत्यक्ष वर्गात शिक्षण) शिक्षण देत आहेत तिथे प्रवेश घ्यावा लागेल (ट्रान्सफर). अमेरिकेतराहून अकेडेमिक शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना F 1 व्हिसा मिळतो, तर व्होकेशनल ट्रेनिंग घेणाऱ्याविद्यार्थ्यांना M 1 व्हिसामिळतो. या शिवाय OPT (ऑपरेशनल प्रॅक्टिस ट्रेनिंग) हा एक प्रकार असतो, ज्यात शिक्षण पूर्णझाल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या प्रकारानुसार किमान 1 वर्ष ते3 वर्षे इतका काळ अमेरिकेतराहण्याची परवानगी असते. सध्या तरी हा निर्णय OPT वाल्यांना लागू नाही असे कळत असले ,तरी ज्यांचेउच्च शिक्षण अजून पूर्ण व्हायचे आहे, अशा कितीतरी विद्यार्थ्यांची झोप उडविणारा हानिर्णय आहे. ट्रम्पप्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या H1B व्हिसा बॅन नंतरची, आंतरराष्ट्रीय रहिवाश्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा हा दुसरा मोठा निर्णय आहे. खरंतर अमेरिकन प्रशासनाने 2029 च्या आर्थिकवर्षात 388,839 F 1 व्हिसा तर 9,518 M 1 व्हिसा प्रदान केलेले आहेत. NAFSA (असोसिएशन ऑफइंटरनॅशनल एज्युकेटर्स) च्या अनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी २०१८-२०१९ मध्येअमेरिकन अर्थव्यस्थेला $ ४१ बिलियन डॉलर्सचा व्यवसाय मिळवून दिलाय. (फीज, घरभाडे,खाणे इ.)
7 जुलै 2020रोजीICE ने जे FAQ's प्रसिद्धकेले, त्याप्रमाणेआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यंकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
१) जर तुमचेकॉलेज अथवा युनिव्हर्सिटी १००% online शिक्षण देतअसेल तर  दुसऱ्याविद्या पीठात स्थलांतरित व्हा, जे इन पर्सन (प्रत्यक्ष वर्गात) शिक्षण देत आहेत.
- Fall २०२० (ऑगस्टते डिसेंबर 2020) साठी देश सोडून तुमच्या मायदेशी जावे लागेल
- अमेरिकेच्याबाहेरून, तुमच्या घरी जाऊनतुम्ही ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकता
२) जर तुमचेकॉलेज अथवा युनिव्हर्सिटी इन पर्सन वर्ग घेत आहे
- तुमच्यावर यानिर्णयाचा कसलाच परिणाम होणार नाही, तुम्ही अमेरिकेत राहू शकता.
३) जर तुमचेकॉलेज अथवा युनिव्हर्सिटी जर हायब्रिड मॉडेल (ऑनलाईन+ इन पर्सन शिक्षण) अवलंबवत आहे तर
- तुम्हालानवीन I -20 मिळेल ज्याततुमची युनिव्हर्सिटी उल्लेख करेल की हा विद्यार्थी १००% online शिक्षण घेत नाहीये
- तुमचा किमान एक तरी क्लास इन पर्सन असणे आवश्यक आहे
- या अटी पूर्णकेल्यावर तुम्ही अमेरिकेत राहू शकता..

यातून इतकंच स्पष्ट झालं आहे की,आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जरी अमेरिका सोडून त्याच्या मायदेशी राहूनऑनलाईनशिक्षण घेत असला तरी त्याचं F 1 किंवा M1 व्हिसास्टेटस वैध राहील. कारण आधी असा नियम होताकी ५महिन्यांपेक्षा जास्त काळ जर विद्यार्थी अमेरिकेबाहेर असेल तर त्याचा ‘सेवेस’ (Student and ExchangeVisitor Record)अवैध होतो आणि त्याला नवीन I -20 आणि व्हिसा मुलाखत द्यावी लागायची, ही अट आताशिथिल केली आहे.  ०७ जुलै २०२०रोजी प्रसिद्ध झालेल्या या FAQ प्रमाणे, अमेरिकन प्रशासनाचे हे म्हणणं आहे, की जरविद्यार्थी १००% online शिक्षण घेत असेल तर, त्याला अमेरिकेत राहायची गरज नाही. परदेशी विद्यार्थीइथं राहूनआमच्या समाजाला/ आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पण असा निर्णय घेताना इथे कुठेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या आरोग्याचा विचारच केलेला दिसत नाहीए. शक्यतो परदेशी विद्यार्थी मोठी आर्थिक गुंतवणूक करून, बहुतांश वेळा शैक्षणिक कर्ज घेऊन अमेरिकेतशिक्षण घेण्यासाठी येतात, हे विद्यार्थी अमेरिकन विद्यार्थ्यांहून तीन ते चार पट अधिक फी भरून शिक्षण घेतात. शिवाय मार्च महिन्यापासून अमेरिकेतील बरीचशी कॉलेजेस अथवा युनिव्हर्सिटी बंदचआहेत, त्यामुळे हे विद्यार्थी कॅम्पसवर अर्धवेळ काम करून जी कमाई मिळवत होते ती ही सध्या बंदच आहे. अशापरिस्थितीत मुळात कोविड 19 ची परिस्थिती चिघळत असताना आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॉलेजेसची फी भरतोय, घरांची भाडी भरतोय, आणि अशा परिस्थितीत परत जायला सांगितले तर भारतासारख्या देशात परत जाण्यासाठी विमानाची तिकिटे साधारण $१५००-२००० डॉलर्स इतकी आहेत.शिवाय जरी विद्यार्थी काही काळासाठी मायदेशी गेले तरी इतक्या अनिश्चित वातावरणात पुन्हा तेअमेरिकेत कधी प्रवेश करू शकतील, हे ही नक्की नाही.

मी स्वत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहे, बोस्टनच्या नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटीत एमएस करतेय. माङो एमएसचे आता शेवटचे तीन महिने राहिले आहेत. माझा फक्त एक कॅपस्टोन प्रोजेक्ट (एक प्रॅक्टिकल प्रोजेक्ट) असतो, जो एका कंपनी सोबत करायचा असतो तो शिल्लक आहे. आता  अनेक मुलांना जे पदवीधर होत आहेत अथवा पीएच.डी. करत आहेत, किंवा ज्यांचं रोटेशनल संशोधन आहे, त्या विद्याथ्र्याना हा निर्णय लागू होणार की नाही, हे सध्यातरी स्पष्ट नाही.
इथे भाडय़ाच्या घरात राहताना विद्यार्थी भाडेकरार करतात जो शक्यतो वर्षभराचा असतो. इतक्या झटपट विद्यापीठ बदलणं किंवा मायदेशी परतणं यापैकी कोणतीच गोष्ट सोपी नाही. सगळ्यात  महत्त्वाचं म्हणजे फॉल 2020 हा ऑगस्टच्या शेवटी सुरू होतो, आणि या विद्यापीठ बदलण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी करायला आता मुळीच वेळ शिल्लक राहिलेला नाही. कोरोनाची परिस्थिती  फारशी बदलेली नसताना अमेरिका पूर्णपणो सुरळीत चालू व्हावी, यासाठी ट्रम्प प्रशासन प्रयत्न करत आहे. 7 जुलै रोजीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शाळा फॉल सीझनमध्ये सुरू झाल्या पाहिजेत अशा आशयाचा ट्विट केलं होतं. थोडक्यात विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग सुरू करणं भाग पाडण्यासाठी हा निर्णय आहे, हे स्पष्ट जाणवतंय.
आम्ही इथं शिकणारे विद्यार्थी एका फेसबुक ग्रुपद्वारेही कनेक्टेड आहोत. रघुराम सुकुमार हा फेसबुक ग्रुप चालवतात. इथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आपल्या समस्यांची चर्चा करतात. या ग्रुपद्वारे रघुराम सर्वाना कायदेशीर सल्लागारांसोबत जोडून देतात.  वेबिनार घेतात. जिथे लोक प्रत्यक्ष प्रश्न विचारू शकतात. एवढा मोठा निर्णय झाल्यावर इमिग्रेशन वकील मुरली बश्याम  यांच्यासोबत आमचा असाच एक वेबिनार झाला. या निर्णयाविषयी बोलताना मुरली म्हणाले, हा निर्णय अंतिम आहे, कारण शक्यतो कोणत्याही निर्णयानंतर अमेरिकेत तो निर्णय लोकांना नोटीस आणि कन्मेंटसाठी  काही वेळ ओपन ठेवला जातो; पण आता तेवढा वेळ नसल्याने ते शक्य नाही, म्हणून हाच निर्णय अंतिम आहे. 

पण मग इथं शिकणाऱ्या  मुलांचं काय?
मी काही दोस्तांशी बोलले. त्यातलीच एक ब्राङिालची अॅनलिझ रोविगाती. माङयाच विद्यापीठात शिकते. ती म्हणते, ‘अमेरिकन शासनाने परदेशी विद्याथ्र्याना आकर्षित करण्यासाठी अनेक धोरणं अवलंबविली आहेत, जेणोकरून  उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्याथ्र्यानी अमेरिकेची निवड करावी. उलट स्थानिक अमेरिकन विद्यार्थी मात्न फारच क्वचित उच्च शिक्षण घेतात, म्हणजेच हे उत्पन्न अमेरिका सोडून इतर देशांकडूनच अमेरिकन विद्यापीठांना मिळते. शिक्षणाचा उत्तम दर्जा आणि बहुसांस्कृतिक अनुभवासाठी अमेरिकेत येतात. अशावेळी परदेशी विद्याथ्र्याबाबत प्रशासनाने आणखी सहिष्णू होण्याची गरज आहे.’
अक्षय भालेराव, मूळचा विरारचा, माङयाच विद्यापीठात शिकणारा, तो सांगतो, ‘फॉल 2020 पासून सुरू होणा:या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला आता संपूर्ण ऑनलाइन विषय घेता येणार नाहीत, हा निर्णय खूपच धक्कादायक आहे. याचाच अर्थ एक तर आम्हाला युनिव्हर्सिटीत जाऊन शिकावे लागेल किंवा देश सोडावा लागेल. खरं तर शिक्षण पूर्ण करून एक-दोन र्वष तरी नोकरीचा- कामाचा अनुभव घ्यायचा माझा  मानस होता; पण या निर्णयामुळे तो पूर्ण होणार की नाही, मला सांगता येत नाही. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मायदेशातून शैक्षणिक कर्ज घेऊन येतात, त्यांची परतफेड या अमेरिकेतील नोकरीवर अवलंबून असते. आता इतकी अनिश्चितता समोर असताना मला आर्थिक दडपणपण आलं आहे.’
एकूणच सध्या तुम्ही विद्यापीठात शिका, कोरोनाला सामोरे जा किंवा मायदेशी परतत जा, असा अवघड पेच अमेरिकी प्रशासनाने आमच्यासमोर निर्माण केलाय.

 

Web Title: trump-admin-says-foreign-students-must-leave-us-if-classes-go-online-what will happen to indian students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.