शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातला तंबू.

By admin | Updated: May 1, 2014 14:53 IST

ओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते.

 कॅम्पिंग
ओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते. वार्‍याचा तो वेग, समुद्राची गाज, निसर्गाचं संगीत, झर्‍यांचं गीत, घनगर्द जंगल, धरतीवर पोहोचण्याआधीच संपलेला चांदण्याचा प्रकाश, आकाशात पोहोचलेले कडे आणि हातात हात घालून डोंगरांनी केलेली लांबच लांब साखळी.
डोंगरदर्‍यातून आणि दगडधोंड्यातून वाहणार्‍या नितळ, स्वच्छ पाण्याचा वेडावणारा गोडवा, मधूनच कुठून तरी दिसलेल्या जंगली प्राण्यांच्या खुणा, त्यांचे अस्तित्व किंवा अगदी समोरून त्यांनी दिलेलं दर्शन.
अंगावर सरसरून उभा राहिलेला काटा, काळाकभिन्न अंधार, उघड्यावरच टाकलेली पाठ, तंबूत घालवलेली रात्र, मी म्हणणार्‍या थंडीत शेकोटीच्या साक्षीनं आणि मित्र-मैत्रिणींच्या साथीनं त्या वैराण रात्री गाणी-गप्पांच्या मैफलीत सरलेली अविस्मरणीय रात्र.
सिमेंट कॉँक्रीटच्या आपल्या जंगलात असला अनुभव कुठला मिळायला?.
त्यासाठी पाठीवर सॅक अडकवून, मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून निसर्गाच्या संगतीत काही रात्री घालवाव्याच लागतात.
कधी अनुभवलाय हा रोमांच?
फार विचार नको, बॅग पॅकिंग करा आणि सुटा.
नाहीच विसरता येणार ते क्षण.

अनुभव

१६ जुलै १९९८ची रात्र.
मी कधीच विसरू शकणार नाही.
त्या रात्रीनं माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. 
माझं मूळ गाव परभणी. तिथेच माझं शिक्षण झालं. त्यावेळी मी कॉलेजला होतो. एका कॅम्पमध्ये ‘व्हॉलंटिअर’ म्हणून काही मित्रांबरोबर मेळघाटात गेलो होतो.
हातरू. मेळघाटातलं एक अगदी लहानसं आदिवासी गाव. परभणीहून अमरावती, परतवाडा अशा गाड्या बदलत रात्री आठ वाजता हातरूला पोहोचलो. तिथून पुढे चिलाटीला जायचं होतं. दोनच किलोमीटरचं अंतर, पण रात्री तिथे जाणं शक्यच नव्हतं. 
तिथल्या एका रेस्ट हाउसच्या पडवीत आम्ही मुक्काम ठोकला. पडवी चारही बाजूंनी उघडीच, वर फक्त पत्रा टाकलेला. त्या पडवीतच आम्ही सार्‍यांनी अंग टाकलं.
माझ्या आयुष्यातला हा पहिलाच ‘कॅम्प’, एका वेगळ्या अनुभवासाठी आणि स्वत:लाही चाचपून पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो.
घरापासून इतक्या लांब मी पहिल्यांदाच आलो होतो.
सारं काही माझ्या कल्पनेपलीकडचं.
माझा जन्म खेड्यातला असला आणि खेडी मी पाहिलेली, अनुभवलेली असली तरी आता मी शहरात राहात होतो. पण असलं गाव आणि खेडं मी पहिल्यांदाच पाहात होतो.
संपूर्णपणे आदिवासी गाव, तिथली माणसं जंगलात राहणारी, माणसांना घाबरणारी, शहरी, अपरिचित ‘माणसं’ पाहून पळून जाणारी, आपल्याला न समजणार्‍या अगम्य आदिवासी भाषेत बोलणारी.
तिथलं जंगलही तसंच. अफाट. चारही बाजूंनी फक्त झाडी आणि जंगल. 
‘जंगल’ मी पाहिलं होतं, पण याला ‘जंगल’ म्हणतात, हे मला पहिल्यांदाच कळलं. पाऊस इतका धो धो कोसळत होता की, असा प्रपाती पाऊस पाहून मला भीतीच वाटली. खेड्यातल्या रात्री मला नव्या नव्हत्या, पण इथली रात्र. आणि तिथला काळोख. अंधार इतका दाट असतो मला माहीतच नव्हतं.
आम्ही पडवीत झोपलेलो. सगळंच काही नवीन आणि अपरिचित. त्यात ‘उघड्या’वर झोपलेलो. भयाण अंधारी रात्र आणि छाताडावर ताडताड नाचणारा पाऊस. खरंच खूप भीती वाटत होती. टक्क जागा. रात्रभर एक सेकंदही डोळ्याला डोळा लागला नाही. थकव्यामुळे पहाटे चार वाजता डोळ्यावर थोडी झापड आली, १५-२0च मिनिटं, पण थोड्याच वेळात थोडासा गलका सुरू झाला. लगेच उठलोही, तर कळलं, पडवीपासून जवळच असलेल्या बकरीला वाघानं फाडून खाल्लं होतं. अंतर फक्त काही फूट! डोक्यात विचार आला, त्या काळोखात वाघानं आपल्यावरच झडप घातली असती तर?. 
- एकदम काळीजच हललं.
वाटलं, कशाला मरायला आलो, आपण इथे?.
- माझ्या पहिल्याच कॅम्पचा हा थरारक अनुभव. पण काही दिवस तिथे राहिलो, काही महिन्यांनी नंतरही पुन्हा एकदा तिथे आलो.
कोण, कुठला मी, कधी जंगल आणि आदिवासीही न पाहिलेला एक कोवळा तरुण.
पण त्यावेळी कुठे माहीत होतं, त्या घनदाट जंगलातले आदिवासी आणि आजही रस्ता, वीज नसलेला हा परिसरच माझं आयुष्य होणार आहे. मला वेड लावणार आहे.
१९९८च्या डिसेंबरपासून मी त्या जंगलातच राहायला गेलो. आदिवासींमधला एक झालो. १६ वर्षं झाली, आजही मी तिथेच आहे.

- रामेश्‍वर फड, ‘मेळघाट मित्र’ चिलाटी, परतवाडा, अमरावती


काय करावं / टाळावं?

1. रामेश्‍वरचा अनुभव थोडा वेगळा आहे, तो ‘कॅम्प’ ला गेला आणि तिथलाच झाला, पण कुठल्याही कॅम्पला जाण्याआधी कोणाबरोबर आपण जात आहोत, त्यांचं रेप्युटेशन काय, हे बघायला हवं.
2. मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून आपण स्वत:च जाणार असू, तर त्यात कोणीतरी किमान एक जाणकार हवा. 
3. निसर्गात आपण जात आहोत, तर तिथे निसर्गाचेच नियम पाळायला हवेत, आपल्या घातक आणि वाईट ‘सवयी’ किमान इथे तरी बाजूलाच ठेवायला हव्यात.

प्रशिक्षण कुठे, कोण देईल?
महाराष्ट्रात आजकाल अगदी लहान गावापासून तर मोठय़ा शहरापर्यंत अनेक जण कॅम्पचं आयोजन करत असतं. ‘खात्री’ करून त्यांच्याबरोबर जायला हरकत नाही.