सोमालियातल्या धाडसी पत्रकार तरुणीनं मोजली जिवाची किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 06:00 AM2019-08-15T06:00:00+5:302019-08-15T06:00:10+5:30

सोमालियातली एक पत्रकार. 9 महिन्यांची गरोदर असताना तिचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. तिचा दोष काय? तर आवतीभोवतीचं वास्तव मांडत बदल करा म्हणून तरुणांना ती प्रेरणा देत होती.

Somalian journalist Hodan Nalayeh killed in attack. | सोमालियातल्या धाडसी पत्रकार तरुणीनं मोजली जिवाची किंमत

सोमालियातल्या धाडसी पत्रकार तरुणीनं मोजली जिवाची किंमत

Next
ठळक मुद्देहुदान नलायाह. तिला जगाचा निरोप घेऊन आता महिना होतोय

- कलीम अझीम

हुदान नलायाह. तिला जगाचा निरोप घेऊन आता महिना होतोय; पण ती नाही असं वाटू नये इतके तिचे चाहते तिला सोबत घेऊन जगत आहेत. तिला टीव्हीवर बघणारे दर्शक स्वतर्‍ला नलायाह म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. नलायाहचं काम त्यांना जिवंत ठेवायचं आहे. एकीकडे असं तिच्या ‘हट के’ कामाचं कौतुक जगभरातून होतोय, तर दुसरीकडे तिच्या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतेय. ती पत्रकार होती, फार प्रसिद्ध किंवा लोकप्रिय होती असंही नाही. पण तिनं केलेलं काम असं की ज्याची नोंद जगभरातल्या माध्यमांनी घेतली. आणि तिच्या मृत्यूचीही. 
अल जझिरानं प्रकाशित केलेल्या विशेष लेखातून नलायाह आपल्याला कळत जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक पैलू उलगडतात. नलायाह एक हौशी पत्नकार होती. पती फरीदसोबत नलायाह सोमालियनांसाठी ‘इन्टिग्रेशन टीव्ही’ नावाचं टय़ूब चॅनल चालवत असे. त्याचे जगभरात लाखो सबक्र ाइबर आहेत. ती आपल्या रिपोर्टिंगमधून सोमालियातील उपासमार, दारिद्रय़, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा नियमित बातम्या न करता जगण्याची ऊर्मी देणारे व इच्छा-आकांक्षांना बळ देणार्‍या हट के स्टोरी दाखवित असे. आपल्या वार्ताकनातून देशवासीयांना दारिद्रय़ातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत असे. या सर्व स्टोरी ह्यकठळए¬फअळकडठळश् या यू-टय़ूब चॅनलवर बघायला मिळतात.

सोमालियासारखा गरीब देश. मागास समाज आणि तिथं एखाद्या तरुण पत्रकारानं असं प्रेरणादायी काम करावं हेच वेगळं होतं. राजकीय तज्ज्ञांच्या मते, देशाच्या पुनर्बांधणीसाठी तिने केलेले प्रयत्न सोमालियन माणसांसाठी पॉझिटिव्ह एनर्जी देणारे होते. ती प्रसिद्धीसाठी नव्हे तर सोमालींना संघटित करण्यासाठी पत्नकारिता करत होती. तिने केवळ सोमाली युवकच नव्हे तर जगभरातील तरुण वाचकांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक कार्यक्र माला लाखो दर्शक लाभलेले आहेत.
मात्र अलीकडेच 13 जुलैला सोमालियाच्या किसनयो शहरात असारे नावाच्या हॉटेलात आत्मघाती स्फोट झाला. या हल्ल्यात हुदान नलायाह आणि तिचा पती फरीद जुमा सुलेमान मारले गेले. तेव्हा नलायाह 9 महिन्यांची गरोदर होती. या दोघांसह 26 जण या हल्ल्यात मरण पावले. या हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या विदेशी पाहुण्यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. अल शबाब या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि पत्नकारांना वंशभेदापासून दूर राहण्याचा इशाराही दिला.
एका फेसबुक पोस्टमधून तिच्या कुटुंबीयांनी नलायाहच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. आणि जगाला ही बातमी कळली. कुटुंबीयांनी नलायाहला श्रद्धांजली वाहताना म्हटलंय, ‘नलायाहने आपलं जीवन सोमाली लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित केलं. अनेकांना आपल्या लेखनातून उमेद दिली.  सोमाली माणसांनीही तिला भरभरून प्रेम दिलं.’
 खरं तर नलायाह फक्त 42 वर्षाची होती. कॅनेडियन नागरिक होती. ती 6 वर्षांची असताना तिनं आईवडिलांसह सोमालिया सोडला. उत्तर सोमालियाच्या लास अनोड शहरात तिचा जन्म झाला होता. पण देशातील अस्थिर वातावरणामुळे आपल्या लहान मुलांसह तिच्या पालकांनी कॅनडात आश्रय घेतला. काही महिन्यांपूर्वी मायदेशी परत आली होती. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं शिक्षण घेतलेल्या नलायाहने 2014 ला स्वतर्‍ ऑनलाइन चॅनल सुरू केलं.
सोमालियातील शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांचा ती वेध घेत असे. तिचं म्हणणं होतं की, ‘आपणच आपले प्रश्न आणि सामाजिक समस्या याविषयी सजग झालो नाही तर आफ्रिकेतलं अडव्हेंचर फक्त कथांपुरतंच आपलं अस्तित्व शिल्लक राहील.’
वेगळेपण सांगणार्‍या तिच्या वृत्तकथांमुळे कॅनडात अनेक सकारात्मक बदल दिसून आल्याचं स्थानिक सरकारनंही मान्य केलं आहे. सोमालियात तिनं सोमालियन महिला उद्योजकांवर वेब सिरीज केली. ही सिरीज बरीच लोकप्रिय झाली आहे. याशिवाय तिनं आपल्या विविध स्टोरीजमधून लास अनोड शहरातील सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित केलं होतं. तिच्या सर्व स्टोरी रें’्रंर4ूूी22 आणि  रें’्रढ2्र3्र5्र38 या हॅशटॅगद्वारे सोशल मीडियावर शेअर झालेल्या आहेत. सामान्य दर्शकांना दिसत असलेल्या सोमालियापेक्षा वेगळा सोमालिया ती आपल्या कॅमर्‍यातून सांगायची. प्रश्न मांडायची. बीबीसीचे सोमालियन पत्नकार फरहान जिमाले म्हणतात, ‘ती विशेषतर्‍ तरूणांसाठी प्रेरणास्थान होती. इंग्रजी आणि सोमाली अशा दोन्ही भाषा तिला उत्तम येत, त्यातून ती वृद्ध सोमालियन माणसांपासून तरुणांर्पयत उत्तम संवादपूल बांधायची.’  
नलायाहच्या मृत्यूनंतर इन्टिग्रेशन टीव्हीने तिच्यावर अडीच तासांचं स्पेशल फीचर रिलीज केलं आहे. यातून तिच्या कामाचे अनेक वेगवेगळे पैलू दिसतात.
 दारिद्रय़, गरिबी, उपासमार आणि वर्णभेदाने ग्रासलेल्या सोमालियाला गेल्या दशकभरापासून दहशतवादाने घेरलं आहे. धर्माच्या नावावर काही माथेफिरू उपाशी, गरीब, निराश्रित लोकांचा बळी घेत आहेत. त्यात नलायाहसारखी बदलासाठी झटणारी माणसंही बळी जातात; पण त्यांचं काम मात्र प्रेरणादायी ठरतंय. नलायाहचंही काम आज अनेकांना प्रेरणा देतं आहे.

 

Web Title: Somalian journalist Hodan Nalayeh killed in attack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.