शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कहो ना, प्यार है.!!

By admin | Updated: February 12, 2015 16:49 IST

लालचुटूक गुलाब, म्युङिाकल ग्रीटिंग्ज, पार्टीशार्टी आणि गिफ्ट्सचा रतीब या सा:या चाकोरीतच आपला व्हॅलेण्टाईन्स डे कोंबायला पाहिजे का?

लालचुटूक गुलाब, म्युङिाकल ग्रीटिंग्ज, पार्टीशार्टी आणि गिफ्ट्सचा रतीब या सा:या चाकोरीतच
आपला व्हॅलेण्टाईन्स डे कोंबायला पाहिजे का?
असा कॉलेजच्या 
सिलॅबससारखा 
कशाला हवा 
ठरवून दिलेला रोमान्स?
असा प्रश्न पडणा:या
कुणाही सामान्य
तरुण-तरुणीच्या
मनातलं हे अव्यक्त पान.
प्रेमाची एक अबोल नोंद.
 
‘त्याच्या’ डायरीतलं एक पान
मी
कोण म्हणून सांगू तुम्हाला? 
काय सांगू की मी कोण आहे?
दीवाना, मस्ताना, हरजाई,
सौदाई, बिलकुल कंवारा.
मै हूॅँ आशिक आवारा.
असं काहीतरी उसन्या शब्दांत सांगू का स्वत:विषयी.?
पण तुम्हीही माङया ‘तिच्यासारखं’ म्हणाल की,
‘काही ओरिजनल सुचतच नाही तुला, सगळं कॉपीपेस्ट.
श्शीùù किती बोअर आहेस तू.’
ती असं म्हणाली ना की, खटकी पडते आपली.
ती मला बोअर कशी काय म्हणू शकते यार.?
म्हणजे मला मान्य आहे की,
मी काही गुलजार नाही, की जावेद अख्तर नाही.
तिला एखादी गझल लिहून पाठवायला.!
(आणि पाठवलीच एखादी कविता लिहून की, 
ती म्हणणार, ईùùù तुङया कवितांनी पकाऊ नकोस हं.
किती टिपीकल कविता करतोस तू.)
म्हणजे एकीकडे अपेक्षा करायची की, 
मी हिंदी सिनेमावाल्यांसारखं तिच्यामागे गाणं गात फिरायला हवं,
तू मेरी जिंदगी है, मेरी हरखुशी है, तूही प्यार, तूही चाहत, तूही आशिकी है.
आणि दुसरीकडे मी केलेल्या कविता तिला पकाऊ वाटतात,
तशा मला कुठं कविता सुचतात म्हणा?
पण तिलाच वाटतं की, मी काहीतरी सुंदर लिहावं,
 तिच्याविषयी, आमच्या नात्याविषयी, काहीतरी मस्त रोमॅण्टिक बोलावं.
काहीतरी स्पेशल-एक्सायटिंग करावं, तिच्यासाठी!
एवढंच कशाला तर आमच्या नात्याविषयी 
फेसबुकावरही काहीतरी ‘सजेस्टिव्ह’ लिहावं.
ते वाचून इतरांना वाटलं पाहिजे की, आमच्यात खूप चिअरफूल रोमान्स आहे.
मला कळत नाही, हे खरंच असं प्रदर्शन करायची गरज असते का?
एकीकडे या प्रदर्शनाची घाई तर दुसरीकडे,
प्रेमाचं एक्सप्रेशन, रोमान्सही
तिला अपेक्षित असलेल्या गोष्टींप्रमाणो झाला 
तरच तिला ते रोमॅण्टिक वाटणार.
आणि ‘ते सारं रोमॅण्टिक’ हे कुणी ठरवलं तर,
मार्केटनं, सिनेमानं आणि टीव्ही सिरीयल्सनी!
म्हणजे काय तर, तिला भेटायला जाताना एखादा मस्त फुलांचा बुके नेणं,
तिच्या बर्थडेला तिच्या घरी रात्री (लपतछपत) जाणं,
मग त्या मेणबत्त्या, ते गिफ्ट्स,  
मित्रमैत्रिणींसोबत पार्टी हे सारं करणं, 
आणि हे सारं केलं म्हणजेच माझं तिच्यावर प्रेम आहे, असं तिला वाटणार.
असं कुठं असतं का?
हे काय कम्पलशन की, तिला ज्या भाषेत हवं त्याच भाषेत मी प्रेम व्यक्त करायला हवं?
आता हे व्हॅलेण्टाईन्स डेचंच उदाहरण घ्या.
गिफ्ट देणं, ग्रीटिंग देणं, लॉँग ड्राईव्हला जाणं, मॉलमधे जाणं, सिनेमा टाकणं हे सारं आपण केलं तरच आपण हॅपनिंग, तरच प्रेम टिकणार, तरच रोमान्स फुलणार. ही सक्तीच आहे.
नुस्ता कलकलाट.
अरे पण, मला जर काहीतरी वेगळं,
 हळुवार, अबोल, अव्यक्त असं काही करायचं असेल तर?
तर त्याला परवानगीच नाही?
अरे, हे प्रेम आहे की भाजीपाला.
बाजारात कुठंही जा, सगळ्यांचं सारखंच.?
प्लीज गिव्ह मी अ ब्रेक.!!
अरे, हे फि ल्मी प्रेमापलीकडे, 
काहीतरी स्वत:चं स्पेशल असं आपलं आपण शोधून तर पाहू.
पण तिला हे कोण समजावणार?
 
‘तिच्या’ डायरीतलं एक पान
मी
एक  सर्वसामान्य मुलगी.
लहानपणापासून मी एकच गाणं 
मनावर कोरल्यासारखं पक्कं धरून ठेवलंय.
परीयों की नगरीसे वो आएगा इक दिन, 
मुङो साथ लेके वो जाएगा इक दिन,
 मेरी मांग तारोंसे भर देगा वो, बनाएगा दुल्हन मुङो.
हे असं सारं करणा:या सपनोंका सौदागरची 
मी वाट पाहिलीये, मनोमन.
असं वाटत राहतं की, खरंच आपल्या आयुष्यात कुणीतरी येईल, 
आणि आपलं जगणंच बदलून जाईन.
पण मग भीती पण वाटते की, 
खरंच असं कुणीतरी आपल्या आयुष्यात येईल का?
आणि आलंच तर आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकू का.?
अपेक्षा कुठल्या?
तर आपण सुंदर असण्याच्या, सुंदर दिसण्याच्या,
त्याच्या मनातलं ओळखून अत्यंत समंजस वागण्याच्या,
त्याच्यासाठी ‘स्वत:ला’ विसरून, स्वत:चं जग सोडून,
त्याच्या जगाचा भाग होण्याच्या?
मी असं म्हणत नाही की, या सा:या अपेक्षा ‘त्याच्या’ आहेत,
पण आदर्श प्रेमप्रकरणात ‘तिनं’ म्हणजे 
माङयासारख्या मुलीनं असंच वागायचं असतं, 
हेच तर सांगतात सिरीयल्स, सिनेमे आणि जाहिराती.
त्याला ‘इम्प्रेस’ करायचं तर आपलं ‘दिसणं’ महत्त्वाचं, 
हेच तर सतत लादलं जातं आमच्यावर, 
आजूबाजूला, अवतीभोवतीही सुंदर मुलींचं वारेमाप कौतुक चालतं.
या सा:यात आपण कुठं आहोत?
चारचौघींसारख्याच दिसणा:या, फार रोमॅण्टिकही नसणा:या,
प्रॅक्टिकल विचार करणा:या.
आणि त्याच्याकडूनही चारचौघींसारख्याच अपेक्षा ठेवणा:या.
आणि मग ते सारं आपल्या संदर्भात घडलं नाही की, 
वाटतं आपणच कुठंतरी कमी पडतोय,
आपल्यातच काहीतरी त्रुटी आहे,
म्हणूनच तर ‘तो’ आपल्यामागे वेडा होत,
काय वाट्टेल ते करायला तयार होत नाही,
त्याला आपलं ‘वेड’ काही लागत नाही.
तो नेहमीच अलिप्त, कोरडा,
जसं काही विशेष असं नाहीच 
आमच्या दोघांच्यात रोमॅण्टिक, असं दाखवणारा.
एका आय लव्ह यूच्या पलीकडे त्याचं गाडं जात नाही,
तेव्हा चिडचिड होते.
पण ती चिडचिड त्याच्यावर नसते,
तर स्वत:वर असते की,
आपल्यातच असं काहीतरी कमी आहे,
ज्यामुळे आपलं प्रेम रोमॅण्टिक, बेभान
आणि बेदरकार व्हायला तयार नाही.
पण हे सारं कुणाला सांगणार?
आणि कुणाला जबाबदार धरणार या परिस्थितीला?
आता उद्या व्हॅलेण्टाईन्स डे,
आमचे अजून काहीच स्पेशल प्लॅन्स नाहीत.
आणि बाकी दुनिया मात्र सेलिब्रेशनच्या तयारीला लागली आहे.
आता सांगा, हे असं झालं तर, 
मी दोष स्वत:ला द्यायचा नाही तर कुणाला द्यायचा?
कारण त्याला काही विचारलं तर तो चिडणार,
उगीच व्हॅलेण्टाईन्स डे ला भांडण नको, 
मीच समजूतदार व्हायला पाहिजे.!
पण म्हणजे प्रॉब्लम माङयातच आहे काहीतरी
असं मी पक्कं समजायचं का?