शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्ड मॅनेजर

By admin | Updated: March 12, 2015 14:43 IST

तुमचे ऑनलाइन व्यवहार सेफ आहेत का?

 
तुम्ही उत्साहानं स्मार्ट फोन घेता. नेटपॅक मारता. दणादण ऑनलाइन शॉपिंगही सुरू करता. पण त्यात काही घोळ झाला तर? आपल्या सिक्युरिटीची काळजी कुणी घ्यायची.
त्यासाठीच ही काही ऑनलाइन मदत.
नक्की वापरा.
ऑनलाइन सिक्युरिटीसाठी.
ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन करताना डबल ऑथेंटिकेशन वापरा. बँका तुमच्या फोनवर रजिस्टर्ड वन टाइम पासवर्ड पाठवण्याचा पर्याय देतात. या दुहेरी व्हेरिफिकेशनमुळे तुमच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये तुम्हाला फसवलं जाण्याची शक्यता कमी होते.
अपडेट
तुम्ही वापरत असलेल्या कम्प्युटरचं अँण्टी व्हायरस, ब्राऊजरची व्हर्जन अप टू डेट ठेवा. कारण या अपडेट्समध्ये वेळोवेळी त्या-त्या वेळचे बग फिक्सेस, सिक्युरिटी अपडेट्स मिळत असतात. जुनी व्हर्जन वापरत राहिलात तर नवीन धोक्यांपासून संरक्षण मिळणार नाही.
Https
वेब अँड्रेसच्या www च्या आधी येणारी ही अक्षरं. Https असणार्‍या वेबसाइट्स या फक्त Httpवाल्या वेबसाइट्स तुलनेत जास्त सुरक्षित असतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना ती वेबसाईट Https सिक्युअर्ड आहे का, ते पाहा.
पासवर्ड
तुमचा ई मेल अकाउंट, बँक अकाउंट, ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन यासाठी युनिक पासवर्ड ठेवा. सहसा तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही ओळखता येणार नाही, असा पासवर्ड असावा. शिवाय ठरावीक कालावधीने हे पासवर्ड बदलत राहा. अनेकांना आपला अकाउंट नंबर आणि पासवर्ड आपल्या ईमेलच्या मेसेज ड्राफ्टमध्ये लिहून ठेवण्याची सवय असते. हे धोकादायक ठरू शकतं. जर कोणी तुमचा ईमेल हॅक केला, तर बाकीचा डेटा आयता त्यांच्या हातात पडेल.
पासवर्ड मॅनेजर अँप
वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण जात असेल, तर फोनवर लास्टपास किंवा वनपासवर्डसारखी पासवर्ड मॅनेजर अँप इन्स्टॉल करा. यामुळे तुम्हाला तुमचे सगळे पासवर्ड्स मॅनेज करणं सोपं जाईल. 
- अमृता दुर्वे