शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी अभी बाकी है!

By admin | Updated: December 25, 2014 19:36 IST

थर्टीफस्टचं सेलिब्रेशन हे पैसेवाल्यांचं काम, त्यांचंच खूळ असा एक सूर अलीकडेर्पयत होता. आता काळाचं चक्र उलटं फिरतंय. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनाही ‘सेलिब्रेशन’ हवंय.

सायली कडू
 
थर्टीफस्टचं सेलिब्रेशन हे पैसेवाल्यांचं काम,  त्यांचंच खूळ असा एक सूर अलीकडेर्पयत होता.
आता काळाचं चक्र उलटं फिरतंय. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे नाही 
त्यांनाही ‘सेलिब्रेशन’ हवंय. आणि शोधलं तर दिसतं की, हॉटेलातल्या नाचगाण्याला आणि खाण्यापिण्याच्या बारमाही सेलिब्रेशनला कंटाळलेल्या तरुण टाळक्यांनी प्लॅनिंग म्हणून एकदम विअर्ड विचार करायला सुरुवात केली आहे. कुणाला सेलिब्रेशन म्हणून आकाशातल्या चांदण्याच मोजायच्या आहेत.
कुणाला अनुभवायचाय मोकळा झोबंरा वारा. कुणाला थंडी ङोलायचीये अंगावर तर कुणाला शेकोटी भोवतीच्या किल्लयावरच्या मैफल जमवायच्या आहेत. कुणाकुणाला नकोय ते रेडिमेड गाणंबजावणं.
अनेकजण आपली बासरी, तबला, गिटार, व्हायोलिन काढून सराव करताहेत थर्टीफस्टच्या कॅम्पफायरसाठी. काही म्हणताहेत. आपणच गाऊन पाहू. जमेल तसं. आपलं सेलिब्रेशन नकोय आता अनेकजणांना टेलरमेड,  मॉलमधल्या कपडय़ांसारखं सगळ्यांसाठी सारखंच. त्यात पर्सनल टच हवाय.ज्याला त्याला. त्यातून सुचलेल्या आणि डोक्यात पिकणा-या या सेलिब्रेशन आयडियांची ही एक झलक.
-----------------
खेडय़ांकडे चला.
थर्टीफस्र्ट आणि घरी? म्हणजे आपल्याच स्वत:च्याच शहरात?
- ही कल्पनाच अनेकांना मानवत नाही. विशेषत: कार्पोरेट जगात काम करणा:या कमावत्यांनी तर कधीच महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, इगतपुरी, कर्जत, लोणावळा, खंडाळा, जव्हार, सापुतारा, लवासा यांसारख्या डेस्टिनेशन्सला जाण्याचं प्लॅनिंग करून टाकलंय. या हिलस्टेशनची हॉटेल्स नवनवीन पॅकेजेस देत आहेत. खाणं-पिणं, डिस्कोथेक, न्यू इयर पार्टी असं सारंच त्यात येतं. साधारणत: कपल्स एण्ट्रीसाठी 5 ते 1क् हजार रुपये मोजावे लागतात. 
कुणी म्हणोल की ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांचे हे चोचले. आमच्याकडे नाहीत पैसे, मग काय करायचं? पण खरं सांगायचं तर असं पैसे मोजून सेलिब्रेशन हे तसं एकसुरीच. सगळ्यांचं सारखंच. मात्र ज्यांची डोकी सुपीक ते अशा हिलस्टेशनला नाही, तर मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसह आपल्या गावी, नाहीतर एखाद्या धरणावर, एखाद्या पाडय़ावर, अत्यंत शांतनिवांत जागी, जिथं मोबाइलची रेंजही येणार नाही अशा ठिकाणी जायचं प्लॅन करताहेत. काहीजण गडकिल्ल्यांवर जाऊन रहायचं ठरवत आहेत. इतिहासाच्या साक्षीनं त्यांना भविष्याचा सूर्योदय अनुभवायचा आहे.
चांदण्या दिसतील आणि मोजता  येतील अशा सुंदर शांत परिसरात जाण्याचं प्लॅनिंग अनेक टाळक्यांत शिजतंय.
 
कोकणातले घर कौलारू
समुद्रकिनारे ही थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनची आणखी एक आवडती जागा. गोवा तर जगभरातल्या लोकांचा फेवरिट. आपल्या कोकणातही गर्दी आता वाढतेय. मात्र तरीही कोकणातल्या समुद्रकिना:याच्या अशा काही जागा आहेत जिकडं फारसं कुणी जात नाही. अशा गावी ओळखीपाळखी काढून, नातेवाइकांच्या मदतीनं राहण्याची सोय करून तरुण मुलंमुली मित्रमैत्रिणीच नाही तर कुटुंबासोबत अशा कोकणातल्या छोटय़ा गावी जायचं, एकदम रस्टिक अनुभव घेण्याचा प्लॅन करत आहेत. 
 
नो ड्रिंक्स प्लीज.
थर्टीफस्ट म्हणजे दारूपाटर्य़ा, हे इतकं सगळ्यांच्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं की दारूशिवाय सेलिब्रेशन हे अनेकांच्या कल्पनेतही येऊ शकत नाही.
पण आता काळ असाही आलाय की, सेलिब्रेशन तर करायचं पण दारू प्यायची नाही असं म्हणणारेही काही ग्रुप्स आहेत. त्यांचं म्हणणं एकच की, आपल्या दोस्तीची आणि एकत्र येऊन केलेल्या धिंगाण्याची नशाच इतकी भन्नाट की दारू प्यायची गरज नाही. त्यामुळे यंदा ‘नो ड्रिंक्स’ पाटर्य़ा ही थीमही अनेकांच्या सेलिब्रेशनचा भाग बनते आहे.
 
आता वाजले की बारा.
पब्ज आणि डिस्कोमध्ये कुठली गाणी इन असतील असा एक आढावा घेतला तर जे रस्त्यावर हीट तेच फाईव्हस्टारमधे इन असा मामला दिसतोय. डान्स बसंती, नच्चो सारे जी फाडके, सन्नी लिओनचे बेबी डॉल, शाहरुखचा लुंगी डान्स, नकाश अजीजने गायलेले साडी के फॉलसा हेच एकदम चलतीत. तिकडे फक्त डीजेंमध्येही चढाओढ लागलेली आहे. कोणत्या गाण्यांमध्ये कुठल्या गाण्याचं मिक्सिंग उत्तम होईल याची जुगलबंदी सुरू आहे. मराठमोळ्या क्राऊडला ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, नटरंगमधलं ‘आता वाजले की बारा’ हे भारी वाटतंय. फिफा 2क्1क् चं ‘वाका वाका’ हे ऑलटाइम हीट गाणं आहेच. ज्यांना पबमधे जाता येत नाही ते ही सारी गाणी एकत्र करुन सीडय़ा बर्न करताहेत.पण नाचणार सारे याच गाण्यांवर.
 
बॉलिवूड-जंगली-अॅस्ट्रॉनॉट
ज्यांच्या खिशात थोडे पैसे आहेत, ते कॉण्ट्री काढून एखाद्या हॉटेलमधे खाण्यापिण्याचं बुकिंग करून टाकतात. पण पार्टीच ना, तिथं रोजचेच कपडे घालून काय जायचं? त्यामुळे यंदा ड्रेसकोड थिम पाटर्य़ाचं खूळ मोठं आहे. त्यातही आघाडीवर आहेत बॉलिवूड थीम. म्हणजे बॉलिवूडवाले जशा स्टाईल्स करतात तसे कपडे, हेअरस्टाईल. तेच जंगली थीमचं. म्हणजे रानावनात राहणा:या लोकांपासून ते प्राण्यापाखरांर्पयत सारं, आणि अॅस्ट्रॉनॉटचं आकर्षण तर मोठं. भारतानं मंगळावर ङोप घेतली म्हणून की काय अंतराळात जाणा:या माणसांपासून ते अंतराळात जगायचं कसं इथवर डोकं लढवून अनेकजण तशा ड्रेसकोडप्रमाणं पार्टीला जायचं प्लॅन करत आहेत.
 
घरची गच्ची, सबसे प्यारी.
खर्चाचा विचार करून म्हणा किंवा घरच्यांबरोबरच सेलिब्रेट करायचं म्हणून म्हणा अनेकजण घरच्या घरीच पार्टी आखण्याचंही प्लॅन करतात.पण म्हणून काही कोणी टीव्हीसमोर बसून रटाळ कार्यक्रम पाहत नाहीत. मस्त जंगी प्लॅन होताहेत घरच्या सेलिब्रेशनचे. त्यालाच आता फॅमिली रियुनियन असंही म्हणतात. 
त्यानिमित्तानं सगळे नातेवाईक एकत्र जमतात आणि धमाल करतात. असा फॅमिली टाइम अनुभवणं हे सध्या इन प्रकरण बनत चाललंय. 
 
चलो बुलावा आया है.
‘न्यू ईयर वेलकम पार्टी’ची संकल्पना धुडकावून लावत काही मुंबईकर तरुण तर थेट सिद्धिविनायक, शिर्डीला पायी जात आहेत. बाकी शहरातही वैष्णवदेवी, तिरुपती इथपासून ते आपल्या आराध्य दैवताचं दर्शन भल्या पहाटे घ्यायचं म्हणून अनेकजण पायीच रात्री निघणार आहेत. रात्रीची भटकंती प्लस सकाळी देवदर्शन असा हा प्लॅन.
 
चलो बुलावा आया है.
‘न्यू ईयर वेलकम पार्टी’ची संकल्पना धुडकावून लावत काही मुंबईकर तरुण तर थेट सिद्धिविनायक, शिर्डीला पायी जात आहेत. बाकी शहरातही वैष्णवदेवी, तिरुपती इथपासून ते आपल्या आराध्य दैवताचं दर्शन भल्या पहाटे घ्यायचं म्हणून अनेकजण पायीच रात्री निघणार आहेत. रात्रीची भटकंती प्लस सकाळी देवदर्शन असा हा प्लॅन.