शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

मेरा जुता है..लेदर अँण्ड लेदर गुड्स

By admin | Updated: May 14, 2014 14:51 IST

लेदरचा व्यवसाय किंवा चर्मकार म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढे काय येतं?

लेदरचा व्यवसाय किंवा चर्मकार म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढे काय येतं?
- रस्त्याच्या कडेला एखादी टपरी टाकून फाटलेले चप्पल, बूट शिवणारा कारागीर किंवा चप्पल, बुटांचं दुकान किंवा अगदीच डोक्यावरून पाणी गेलं तर महिलांच्या पर्स, लेदर बॅगा विकणारा विक्रेता किंवा या वस्तूंचं दुकान.
- पण असलं काही तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकताहेत.
गेल्या काही वर्षांपासून अतिशय वेगानं वाढणारा आणि मोठं पोटेन्शिअल असलेला हा व्यवसाय आहे. ज्या उद्योगांतून भारताला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळतं त्या पहिल्या दहा उद्योगांतील हा व्यवसाय आहे, असं सांगितलं तर तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. 
या संदर्भातल्या काही वास्तवाकडे नुसती नजर टाकली तरी कळेल की, या व्यवसायात किती मोठं भविष्य दडलेलं आहे. या उद्योग-व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल भारतात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर आहे. - किती?. संपूर्ण जगातल्या जनावरांच्या आणि म्हशींच्या तुलनेत भारताकडे तब्बल २१ टक्के जनावरे आहेत, तर जगातल्या एकूण शेळ्या आणि मेंढय़ांच्या तुलनेत भारताकडे ही संख्या ११ टक्के आहे. 
आजच्या घडीलाच या व्यवसायाने भारतात तब्बल २५ लाख लोकांना रोजगार पुरवला आहे. या व्यवसायात महिलांचं वर्चस्व असून, यातील तब्बल तीस टक्के महिला या क्षेत्रात आहेत. 
लेदर इंडस्ट्रीत इतक्या अगणित संधी आहेत की, नुसती नावं घेतली तरी आपलं डोकं चक्रावून जाईल. लेदरच्या फॅशन्स, लेदर गारमेन्ट, लेदर फुटवेअर, लेदर फर्निचर, लेदर इंटेरिअर. 
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांनी सध्या जगाला वेड लावलं आहे. 
साधं फुटवेअर म्हटलं तरी याच्या निर्मितीत जगात चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. दरवर्षी सध्या भारतात २१0 कोटी पादत्राणे तयार होतात. त्यातली तब्बल दोन कोटी पादत्राणे तर देशांतर्गतच विकली जातात. लेदरपासून बनवलेल्या वस्तूंची देशविदेशांत निर्यातही मोठय़ा प्रमाणात होते.
येत्या काळात या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बूम येणार असून, रोजगार निर्मितीत तर प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. 
आजपर्यंत या क्षेत्राकडे सुशिक्षित तरुणांचं मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष झालं, कारण या क्षेत्रातल्या संधीच आपल्या लक्षात आल्या नाहीत. त्यासंदर्भातले कोर्सेसही नव्हते. आता तर काही ठिकाणी ‘लेदर गुड्स अँण्ड अँक्सेसरीज डिझाईन’चे कोर्सेसही काही ठिकाणी सुरू झालेत. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मोठमोठय़ा उद्योजकांनीही स्वत:च आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. 
‘मेरा जुता है जपानी’. अशी गाणी पूर्वी भलेही आपल्याला चित्रपटांतून ऐकायला मिळालेली असतील, पण सध्या वास्तव वेगळंच सांगतंय आणि जगभरात ‘इंडियन जुता’ आपल्या पायाशी असावा यासाठी अनेक जण पाय धुवून तयार आहेत.!
वाहत्या गंगेत आपल्यालाही हात धुवायचे असतील, तर या क्षेत्राकडे बारकाईनं बघायलाच हवं.
 
लेदर गुड्स अँण्ड अँक्सेसरीज डिझायनर
पर्स, बेल्टपासून तर लेदरचे वेगवेगळे डिझायनर आयटेम्स सध्या फारच इन आहेत. त्यांना मोठय़ा प्रमाणात मागणीही आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या डिझायनर्सना अर्मयाद संधी आहेत.
 
लेदर गारमेन्ट निर्माता
लेदर गारमेन्टला मिळणारी पसंती आणि या क्षेत्रातील भारताचं योगदान पाहता येत्या काळात लेदर गारमेन्टला खूप मोठं मार्केट आहे. सध्याच भारत लेदर गारमेन्ट निर्मितीत जगात दुसर्‍या स्थानावर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ वीस कोटी वस्तू भारत तयार करतो.
 
लेदर अँक्सेसरीज, आर्टिकल्स
लेदरच्या शोभेच्या वस्तू, खेळणी, गिफ्ट्स, म्युझिकल इन्स्ट्रमेन्ट्स, पाकिटं. अशा वाट्टेल त्या वस्तू लेदरपासून तयार केल्या जातात. येत्या काळात केवळ फॅशन स्टेटमेन्ट म्हणूनच नव्हे, तर अत्यावश्यक आणि टिकाऊ म्हणूनही या लहान-मोठय़ा वस्तूंना खूप मोठय़ा प्रमाणावर मागणी असेल.
 
पूरक उद्योग-व्यवसाय, नोकरी.
लेदर इंडस्ट्रीच्या बूममुळे परंपरागत कामांसाठी आणखी स्किलफूल वर्कर्सची आवश्यकता भासणार आहे. आताच त्यांची टंचाई जाणवते आहे. चामडी कमावणारे कारागीर, लेदर कटिंग, स्टिचिंग, फिनिशिंग, ते टिकावे म्हणून त्यावर करावयाची प्रक्रिया. इत्यादी कामांसाठी मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षित कारागिरांना संधी आहे.