शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल डाटा बंद

By admin | Updated: March 12, 2015 15:03 IST

मुळात प्रश्नच चुकीचा असेल, तर बरोबर उत्तर कसं मिळेल? चुकतंय काय हे स्वत:ला विचारा!

‘व्हॉट्सअँप’वर आपला फार वेळ जातो आहे; त्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन होतं आहे. आपला फोकस त्यामुळेच हलला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही समजूत पहिले मनातून काढून टाका!

व्हॉट्सअँप सतत पाहून पाहून, तिथं बोलून बोलून तुमचा फोकस हललेला नाही हे पहिले लक्षात घ्या.
उलट तुम्ही सतत व्हॉट्सअँपवर जाताय, तिथं बोलताय, कोण काय म्हणतंय ते वाचताय, इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल अशा पोस्ट करताय, याचा अर्थ मुळातच तुमचा ‘फोकस’ हललेला आहे. मुळातच तुम्ही डिस्ट्रॅक्ट आहात. तुमचं अभ्यासात लक्ष नाही, मन रमत नाही, तुमच्या मनाला काहीतरी टोचतंय, कुणाला ते सांगता येत नाही. म्हणून मग गप्प बसण्यापेक्षा तुम्ही स्वत:चा ताण कमी करण्यासाठी सतत व्हॉट्सअँपवर जाता, तिथं काहीबाही बोलता, चर्चा करता, सतत बोलता आणि स्वत:वरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करता!
त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त व्हॉट्सअँप परीक्षा काळातही वापरत असाल, तुम्हाला त्याशिवाय करमतच नसेल तर त्याचं खापर त्या साधनावर फोडू नका.
आपलं काय बिनसलंय, आपलं मन कशानं नाराज आहे, अभ्यासात आपल्याला काय जमत नाहीये म्हणून आपण ही पळवाट शोधतोय याचा जरा विचार करा.
या प्रश्नांची उत्तरं सापडली, तुमचं मन अभ्यासात गुंतलं, तुमची प्रायॉरिटी काय हे तुमच्या लक्षात आलं तर तुमचं मन व्हॉट्सअँपकडे फार धाव घेणार नाही. फारतर विरंगुळा म्हणून तुम्ही त्याकडे पाहाल. बोलाल, शेअर कराल, रिलॅक्स व्हाल!
त्यामुळे तुमच्या मनातला प्रश्नच चुकीचा आहे हे समजून घ्या, म्हणजे मग बरोबर उत्तर सापडेल!!
आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटच्या क्षणी कुणाचाही अभ्यास होत नसतो. तुम्ही वर्षभर काहीही केलं नसेल आणि आता लास्ट मिनिट रट्टा मारू म्हणत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि तो उपयोग होत नसेल तर तुम्ही त्याचं खापर आपल्या हातातल्या मोबाइलवरही फोडून काही उपयोग नाही. ती दुसरी एक पळवाट ठरेल.
त्यामुळे तुम्ही आधीपासून अभ्यास केलेला असेल आणि आता तुमचा मानसिक ताण खूप वाढत असेल, आपण ब्लॉक होतोय, मेंदू शिणला आहे असं वाटत असेल तर खरंच रिलॅक्स करा!
आणि ते रिलॅक्सेशन तुम्हाला व्हॉट्सअँप वापरून मिळणार असेल, जरा हलकं-हायसं वाटणार असेल, मित्रांशी बोलून, आपला प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करून जरा रिलीफ मिळणार असेल तर बिंधास्त थोडावेळ व्हॉट्सअँप वापरा.
त्यानं तुमचं नुकसान होणार नाही, झाली तर मदतच होईल!
कारण नुस्तं अभ्यास एके अभ्यास करत राहिलं, सतत डोळ्यासमोर पुस्तक धरलं तरी वाचलेलं तुमच्या मेंदूत सेव्ह होईलच असं काही नाही. उलट अनेकदा कम्प्युटरसारखंच होतं. आपण जे काम करतो, त्याच्या फाईल्स तयार होतात. पण त्या दिसत नाहीत, सापडत नाहीत. त्याला हिडन फाईल्स म्हणतात. त्या तयार होतात पण त्यांचा उपयोग काही होत नाही. तसंच आपल्या मेंदूतही हिडन फाईल्स तयार होतात. मेमरीत काही उतरत नाही. उपयोग शून्य.
हे असं कशानं होतं तर तुम्हाला एन्झायटी मॅनेजमेण्ट जमत नाही. मनावरचा ताण हलका करता येत नाही. शीण कमी होत नाही.
हा शीण उतरला नाही तर जे येतं तेही येणार नाही. आणि तो शीण उतरवण्याचा ज्याचा त्याचा मार्ग असतो.
आता जर मित्रांशी व्हॉट्सअँपवर बोलणं हा शीण कमी करण्याचा मार्ग आहे असं तुम्हाला वाटत असेल,
तर रिलॅक्स करा, अर्धा तास भरपूर गप्पा मारा, हसा, चेष्टा करा, जोक एन्जॉय करा.
ैआणि पुन्हा अभ्यासाला लागा.
तुम्ही रीफ्रेश व्हाल.
पण मुळातच अभ्यास काही नसेल, त्याचंच टेन्शन असेल, डोक्यात काहीच शिरलेलं नसेल, तर व्हॉट्सअँप वापरल्यानं माझं नुकसान झालं असं म्हणण्यात काहीच हाशील नाही!!
 
परीक्षेच्या काळात एवढं करता येईल?
 
१) वर्षभर अभ्यास केलेला असेल किंवा तुम्ही आत्ताही उत्तम अभ्यास करत असाल तर रिलॅक्स व्हायला अर्धापाऊण तास व्हॉट्सअँप वापरायला काहीच हरकत नाही.
२) अनेक शिक्षक व्हॉट्सअँपवर अँव्हेलेबल असतात; त्यामुळं काही अडलं तर त्यांना विचारा, पुन्हा आपल्याला समजलंय की नाही याची खात्री करून घ्या.
३) मित्रांशी बोलून तुम्हाला चांगलं वाटतं ना; जरा रिलीफ मिळतो; मग बोला. पूर्वी मित्रांना भेटल्यावर बरं वाटतं, आता व्हॉट्सअँपवर भेटता येतं, एवढंच! त्या भेटीनं मेंदूचा शीण उतरणार असेल तर काय हवं!
४) तुमचा ओढा व्हॉट्सअँपकडे अतीच असेल; त्याशिवाय काहीच सुचत नसेल तर तुमचं मन ताळ्यावर नाही असं समजा. कुणाशी तरी बोला, पालकांशी बोला, मदत घ्या. गप्प राहू नका.
 
५) व्हॉट्सअँप हा आपल्या प्रेशर कुकरचा वॉल्व आहे असं समजा, तो उडू देऊ नका. तेवढय़ापुरताच वापरा!!
 
 
- डॉ. हरीश शेट्टी
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ
(शब्दांकन- ऑक्सिजन टीम)