मिस ट्राफिक पोलीस

By admin | Published: February 8, 2017 03:22 PM2017-02-08T15:22:38+5:302017-02-08T15:22:38+5:30

... सक्काळी सक्काळी या चौकातली ही गर्दी. अश्शीची ठरलेली. नेहमीप्रमाणे डावीकडच्या सिग्नलचं ट्रॅफिक इथपर्यंत आलंय आणि इथे उजवीकडे हा दुसरा सिग्नल लागलाय. गाड्याच गाड्या. हॉर्न आणि धूर... तरीपण अशी गर्दीतून वाट काढत चालण्यात वेगळीच मजा आहे. सगळं जग सिग्नल सुटायची वाट बघत थांबलंय.

Miss Traffic Police | मिस ट्राफिक पोलीस

मिस ट्राफिक पोलीस

Next


- प्रसाद सांडभोर

... सक्काळी सक्काळी या चौकातली ही गर्दी. अश्शीची ठरलेली. नेहमीप्रमाणे डावीकडच्या सिग्नलचं ट्रॅफिक इथपर्यंत आलंय आणि इथे उजवीकडे हा दुसरा सिग्नल लागलाय. गाड्याच गाड्या. हॉर्न आणि धूर... तरीपण अशी गर्दीतून वाट काढत चालण्यात वेगळीच मजा आहे. सगळं जग सिग्नल सुटायची वाट बघत थांबलंय.
आपण मात्र मनमौजी - आपले आपले चालतोय. 
रोजचीच गर्दी, रोजचाच रस्ता आणि रोजचीच मजा... 
अरेच्चा! आज सिग्नलजवळ चक्क ट्राफिकपोलीस उभी आहे!
मिस ट्रॅफिक पोलीस म्हणावं का? 
आपल्याएवढीच दिसतेय वयाने एखाददोन वर्ष पुढेमागे... 
नाकावर मास्क लावलंय. पाठीवर सॅक अडकवलीय...
सिग्नलच्या बॉक्समध्ये हात घालून काय बरं करतेय ती?... 
ओह, गर्दीनुसार बटण दाबून सिग्नलची वेळ अ‍ॅडजस्ट करतेय. 
बाप रे! कसलं काम आहे हे.
किती वेळाची ड्यूटी असत असेल? 
किती वेळ असं एकाजागी उभं राहायचं?
उन्हापावसात - हॉर्न - धुरात? 
मी जरा जास्तच रोखून पाहतोय का?
तिनं का बरं असं पाहिलं आत्ता माझ्याकडे?
चलो बाबू, ट्राफिक कण्ट्रोलला असली तरी पोलीस आहे ती!

***
पटपट चालायला हवं नाहीतर गॅलरीतला सूर्यास्त मिस होणार! 
या गर्दाळलेल्या लोकांना सूर्यास्त - संध्याकाळ - कशाचीच काही फिकीर नाही. 
हे काय? मिस ट्रॅफिक पोलीस अजूनही इथेच! 
संपूर्ण दिवसभर इथेच होती ही? आता तर सिग्नल पूर्णच बंद पडलाय वाटतं - हातवारे करून काम चाललंय एकटीचं... ट्राफिक पोलीस का बरं बनली असेल ही मुलगी? कधी ठरवलं असेल? केवढी एनर्जी लागत असेल दिवसभर? - कसं बरं मॅनेज करत असेल असं काम? मलाच उगीच वाटतंय की खरंच हसली ती आत्ता माझ्याकडे पाहून? ओळख काढून बोलावं का? विचारावेत सगळे प्रश्न?
आत्ता नको नंतर कधीतरी. 
 

xprsway@gmail.com

Web Title: Miss Traffic Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.