शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

झाडवालं लव्ह

By admin | Updated: October 16, 2014 18:52 IST

झाडं मोठी झाली. रस्त्यावर सावली धरू लागली. फुलं-पानं तर डवरलीच पण मुख्य म्हणजे १५-१६ प्रकारचे पक्षी आता आमच्या भागात दिसू लागले

सुचेता पाटील,( इचलकरंजी) - प मोठय़ा ग्रुपनं केलेलं खूप मोठं काम नाहीये आमचं ! आम्ही दोघी मैत्रिणी. चौदा वर्षांपूर्वी नवीन घर बांधलं. वास्तुशांतीला तिनं मला एक झाड भेट दिलं. त्या दिवसापासूनच मी कॉलनीत झाडं लावायला सुरुवात केली. वेड्यासारखी झाडंच लावत सुटले. त्यातही दुर्मीळ, देशी, औेषधी गुणधर्म असलेली आणि विदेशी नसलेली झाडं लावली. आपल्याच माणसांना आता जी देशी झाडं अनोळखी वाटतात, ती शोधून शोधून आणून लावली. दुपारी झोपा न काढता शेळ्यामेंढय़ापासून ती झाडं वाचावीत म्हणून रखवालीही केली. झाडं मोठी झाली. रस्त्यावर सावली धरू लागली. फुलं-पानं तर डवरलीच पण मुख्य म्हणजे १५-१६ प्रकारचे पक्षी आता आमच्या भागात दिसू लागले. पक्ष्यांची घरटी बघायला मिळू लागली. सुरुवातीला मला हसणारे, उदासीन असणारे लोकं आता झाडांची स्वत:ही काळजी घेऊ लागले. आणि आजही माझ्या मैत्रिणीनं दिलेला ‘बहावा’ सुंदर मनमोहक रूप घेऊन आमच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून दारात उभा आहे. एक ‘नेवरा’ आणून मी लावला होता. तो मूलचा समुद्रकिनारी प्रदेशातला. तो आपल्या भागात जगणारच नाही असं सार्‍याचं मत. पण तो जगला. आणि तुळशीचं तर जंगलच झालंय माझ्या घरी. आता भेट म्हणून मी ती रोपंच वाटत असते.आता कॉलनीतली जागा कमी पडतेय तर दुसरीकडे कुठं झाडं लावता येतील का हे शोधतेय. आणि हे सारं समाजासाठी नाही तर स्वत:साठीच.हे झपाटलेपण फक्त झाडं आणि पक्षी प्रेमातून आलंय.