शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

.आहे मी गावठी!

By admin | Updated: October 16, 2014 19:34 IST

हे सारं वाचून एक ट्यूब माझ्या डोक्यात पेटलीये ती तुमच्याशी शेअर करायची म्हणून हे पत्र लिहितोय. त्यासाठी आधी माझीच एक आठवण सांगतो.

- अतुल घेवडे

मस्त वाटतं, खरंच सांगतो मस्त वाटतं, दर शुक्रवारी ‘ऑक्सिजन’ वाचून, एकदम एनर्जेटिक !हे सारं वाचून एक ट्यूब माझ्या डोक्यात पेटलीये ती तुमच्याशी शेअर करायची म्हणून हे पत्र लिहितोय.त्यासाठी आधी माझीच एक आठवण सांगतो. मी एका ठिकाणी इण्टरव्ह्यूला गेलो होतो. पुण्यात. चकाचक ऑफिस. मी डिप्लोमा इंजिनिअर आहे. आता बीई करतोय. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेलं माझं गाव. मी पहिल्यांदाच पुण्याला गेलो होतो. त्याआधी पुणं कधी पाहिलंही नव्हतं.मुलाखतीला गेलो. बसलो. पाहिलं तर अवतीभोवती सगळी हायफाय पोरं. एकदम इंग्रजी बोलणारी. भारीतले कपडे. मला जाम टेन्शन आलं. आमचं मराठीपण कन्नड वळणाचं. हेल काढून बोलतो आम्ही असं लोकं म्हणतात. हसतात आमच्या मराठीलाही. इंग्रजी-हिंदीपण जेमतेम.मी जरा घाबरलोच होतो. पायात कापरं भरलं होतं.पण दिली मुलाखत. सिलेक्टही झालो. नोकरीपण मिळाली.या सगळ्यात माझ्यासोबत होता ऑक्सिजननं दिलेला कॉन्फिडन्स. आपण जसे आहोत तसे आहोत. आपल्याला जे येतं ते ठामपणे मांडायचं. न बिचकता बोलायचं. आणि न घाबरता आहे त्या परिस्थितीचा सामना आपल्या गुणवत्तेच्या जोरावर करायचा.तेच मी केलं.यापुढेही करीन.एक मात्र नक्की,आता मला कळून चुकलंय की, गावठी कुणी म्हटलं आपल्याला तरी मनाला लावून घ्यायचं नाही.गावठी असणं यात कमीपणा काही नाही, आपली भाषा नाही तर आपली गुणवत्ता आपलं स्थान ठरवते.TTMM म्हणजे काय?TTMM म्हणजे  टेन्शन-टेंगळं-मस्ती- मॅजिक.म्हणजे काय?तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच!म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे!मग वाट कसली पाहता.?लिहा बिंधास्त.आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे.आम्ही वाट पाहू.आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.पत्ता?ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी अंबड, नाशिक, ४२२0१0