शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

मी कुठला हेअर कट करू?

By admin | Updated: February 26, 2015 21:22 IST

आपल्या चेह:याला शोभून दिसेल असा हेअरकट कसा निवडायचा, हेच सांगणारे काही बेसिक नियम

आयुष्यात डोक्याला सर्वाधिक ताप देणारा कुठला प्रश्न असेल तर तो म्हणजे हेअरकट!
अवतीभोवती पाहावं तर मैत्रिणींचे, सेलिब्रिटीजचे इतके सुंदर हेअरकट दिसतात. आणि आपण मात्र कुठला हेअरकट करावा हे कळत नाहीत.
त्यात दिसण्याबिसण्यासंदर्भात कुठलाही लेख वाचला तरी हेच सांगतात की, तुमच्या दिसण्यात तुमच्या हेअरकटचा वाटा सर्वाधिक मोठा आणि महत्त्वाचा असतो.
पण तरी मुख्य मुद्दा उरतोच की, आपल्याला कुठला हेअरकट चांगला दिसेल हे कसं ठरवायचं? फॅशन काही का असेना, आपल्याला काय चांगलं दिसेल, हे कसं ओळखायचं!
खरंतर हेअरकटसंदर्भात अनेक प्रयोग करून, त्यातून लूक चेंज करून पाहायला हरकत नाही. पण तरीही हेअरकट कुठला करायचा, हे ठरवताना आपण काही नियम कायमस्वरूपी पाठ केल्यासारखे जर लक्षात ठेवले तर आपला हेअरकट सहसा चुकणार नाही, उलट आपल्याला एक उत्तम लूक मिळू शकेल.
त्यासाठीच हे काही नियम.
 
1)  आपल्या केसांचा प्रकार, पोत, थिकनेस तसंच चेहरा, मान, खांद्याचा आकार या गोष्टी हेअरकट ठरवताना अत्यंत महत्त्वाच्या!
2) गालाचा तसेच जीवणीचा भाग खूप मोठा असेल तर त्या भागाला कव्हर करेल इतपत चेह:याच्या पुढच्या केसांची उंची असावी. 
3)  माथ्यावर केस विरळ असतील तर तिथल्या भागात शक्यतो थोडे लेअर्स द्यावेत. 
4) ज्यांचे कपाळ खूप मोठे असेल त्यांनी कपाळाचा थोडा भाग कव्हर करण्याकरता फ्लिक्स करावेत किंवा फ्रिजेस करावेत. 
5) चेहरा खूप उभा असेल तर शक्यतो पुढचे केस जिवणीर्पयत घेऊन मग मागच्या बाजूच्या केसांना स्टाईल करावी जेणोकरून चेहरा लांबुळका दिसणार नाही, उलट त्याला सुंदर आकार मिळेल.
6) कुठलाही हेअर कट किंवा मेकअप यांच्या मदतीनं आपला चेहरा ओव्हल कसा दिसेल याकडे लक्ष द्यावे. ओव्हल आकाराचा चेहरा कायम सुंदर दिसतो.
7) ज्यांचा चेहरा खूप छोटा आहे त्यांनी  चेह:यावर फार केस येऊ देऊ नये नाहीतर चेहरा अजून लहान दिसतो. 
8) हे किमान नियम ठेवले तर तुम्ही कुठलाही हेअरकट करा, तो चांगलाच दिसेल. कारण प्रत्येक चेह:याप्रमाणं हेअरकट बदलतो, पण हे काही बेसिक नियम आहेत, ते बदलत नाहीत. त्यांचा विचार करून मगच स्वत:साठी हेअरकट निवडा!