शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा, तुमचं काय गेलं?

By admin | Updated: February 5, 2015 20:02 IST

असा रोकडा सवाल विचारणारी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली तेव्हाची तरुण पिढी आणि आजचं तारुण्य यांच्या जगण्यात खरं तर किती तफावत आहे..

 ऑक्सिजन टीम - 
असा रोकडा सवाल विचारणारी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली तेव्हाची तरुण पिढी आणि आजचं तारुण्य यांच्या जगण्यात खरं तर किती तफावत आहे..
पण तरीही आजही ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या दोन विषयात तरुण पिढी त्याच त्या जुन्या प्रश्नांशी झगडते आहे. घरच्यांचा विरोध, समाजाची मान्यता, जातीपातीचे प्रश्न, सामाजिक विरोध आणि बहिष्काराच्या तलवारी हे सारे प्रश्न शहरी भागात थोडेबहुत निवळलेले दिसत असले तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही हे काच तरुण मुलांना छळताहेत.
प्रेमाला विरोध, इमोशनल ब्लॅकमेल, जाणत्या मुलांना मन मारायला लावून मनाविरुद्ध लग्न करायला भाग पाडणं हे सारं तर आपल्याकडे सर्रास होतंच..
पण आता नव्या टेक्नॉलॉजीचा वापरही प्रेमात पडणार्‍यांच्या बदनामीसाठी होऊ लागला तर?
त्याचंच एक उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीला काही लोकांनी बेदम मारण्याचा व्हिडीओ. तो इतका व्हायरल झाला की, राज्यात अनेक तरुणांच्या हाती पोहोचला. त्यांनी पाहिला.
त्यातून पुण्यातील एक तरुण ग्रुप खवळला आणि त्यांनी एक रॅलीच काढली. समाजाला ठणकावून सांगितलं की, आम्हाला प्रेमात पडण्याचा अधिकार आहेच. तुम्ही कोण आमचा अधिकार नाकारणारे.
मूळचे ग्रामीण भागातले, पण आता शिक्षणासाठी शहरात राहणारे अनेक तरुण मुलंमुली या रॅलीत सहभागी झाले. त्यांचं म्हणणंच होतं की, ‘आज प्रेमात पडणं, उद्या ब्रेकअप परवा नवीन रिलेशनशिप या शहरी तारुण्याच्या सहज आयुष्याला आमचं जगणं कळतही नाही. आजही ग्रामीण भागात मनापासून आवडलेल्या व्यक्तीची आपल्या जगण्याचा जोडीदार म्हणून निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्ही अजूनही कुटुंब आणि समाज यांच्यासाठी मन मारूनच जगावं लागतं. हे सारं कोण समजून घेणार? शहरी समाजच नाही तर शासनाला आमची ही कुचंबणा कधी कळणार?’
असे प्रश्न अनेक..
एकीकडे जगभर व्हॅलेण्टाइन वीक अर्थात रोमॅण्टिक साजरा होतो..
भारतीय बाजारपेठाही प्रेमाच्या उत्सवाचं सेलिब्रेशन करतात..
त्यासाठी सजतात..
आणि त्याच समाजातली बहुसंख्य ग्रामीण तारुण्य प्रेमात पडणं पाप आहे की गुन्हा असं वाटावं इतका समाज त्यांना छळतो..
या विरोधाभासात. कसं रुजावं प्रेम?
आणि कशी मिळावी उभारी प्रेमात पडून मनासारखं जगण्याची स्वप्न पाहणार्‍या तरुण मुलांना?
- याच प्रश्नांची विशेष चर्चा..
भेटतील काही अस्वस्थ धास्तावलेले  प्रश्न..