कॅनडा आणि जर्मनीमध्ये शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या ‘लॉकडाउन’ आयुष्यात आत्ता काय चालू आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:32 PM2020-05-21T15:32:49+5:302020-05-21T15:41:35+5:30

कोरोना काळातले परदेसिया.

friends studying in Canada and Germany shares their lockdown story. | कॅनडा आणि जर्मनीमध्ये शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या ‘लॉकडाउन’ आयुष्यात आत्ता काय चालू आहे?

कॅनडा आणि जर्मनीमध्ये शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या ‘लॉकडाउन’ आयुष्यात आत्ता काय चालू आहे?

Next
ठळक मुद्देकोरोनाचे भय आणि दडपण प्रत्येकाच्या मनात आहे.

शिक्षणासाठी ‘स्थलांतर’ करून परदेशी गेलेली तरुण मुलं. या कोरोनाकाळात एकेकटय़ाने अभ्यास, पार्टटाइम जॉब, स्वयंपाक असं सारं सांभाळून स्वत:चाच आधार बनली आहेत. हा कोरोनाकाळ त्यांना काय शिकवतोय, कसं निभावताहेत ते आपलं खरं ‘शिक्षण?’ त्याविषयी या प्रातिनिधिक गप्पा.

कम्युनिकेशन हे सूत्र!- - गार्गी कुलकर्णी

मला कॅनडात येऊन आता चार वर्षे झाली.  मी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेण्ट शिकतेय. सप्टेंबर 2019 पासून मी पार्टटाइम जॉबही सुरूकेला होता, त्यामुळे अभ्यास आणि जॉब हे मी एकत्र जमवलं होतं, तेवढय़ात कोरोनाची साथ सुरू झाली.
 इथं एक गोष्ट मला चांगली वाटली की, सरकार सगळी माहिती मोकळेपणानं देत होतं. कॅनडाचे नागरिक असलेल्या विद्याथ्र्यासाठी सरकारने योजना जाहीर केल्या. त्यांना थेट काही पैसे मिळू लागले. दुसरीकडे सरकारने कॅनडा नागरिकांसाठी कॅनडा इमर्जन्सी रेस्क्यू बेनिफिट अशी काही योजना जाहीर केली. म्हणजे ज्याच्याकडे कॅनडातलं सिमकार्ड आहे, त्याला दोन हजार डॉलर्स लगेच मदत मिळू लागली. कुणाला गरज आहे का, कुणाला नाही याची चर्चा न करता सरकारने मदत देऊ केली, आता नंतर हे सारं संपल्यावर कोण गरजू, कुणी उगीच पैसे घेतले, कुणाकडून कशी वसुली करायची हे नंतर ठरेल. आज मात्र आर्थिक मदत प्रत्येकाला देण्यात येते आहे.
दुसरीकडे मी स्टारबक्समध्ये काम करते. ती अमेरिकन कंपनी आहे. त्यामुळे अमेरिकन नियमांप्रमाणो चालते. मी आठवडाभरात 15 तास काम केलं तर ते मला माझं वेतन देत राहतील. मी जिथं काम करते, त्या इमारतीत ब:याच बँका, लॉ फर्म आहेत. ते जीवनावश्यक यादीत येतं. बाकी सगळं बंद असल्याने माङया शाखेच्या मॅनेजरने आमची स्टारबक्सची शाखा उघडायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता तिथं आम्ही जे लोक नियमित काम करू त्यांना तीन डॉलर्स जास्त मिळतील असंही त्यांनी सांगितलं. लोकांच्या हातात पैसा देण्याचं हे धोरण मला जास्त आवडलं.
अभ्यासाचं म्हणाल तर कोरोना लॉकडाउन जाहीर होताच, माङया स्कूलने ऑनलाइन परीक्षा घेतल्या, ज्या कम्फर्टेबल होत्या. त्यांनी माहितीही नीट दिली. दोन आठवडय़ात रिझल्ट लागले, त्यासाठीचे नियमपण त्यांनी आधीच स्पष्ट केले. कम्युनिकेशन हे कोरोना काळात इथल्या सगळ्या कामाचं सूत्र आहे, त्याने ब:याच गोष्टी सोप्या केल्या असं मला वाटतं. त्यामुळे माङयासारख्या विद्याथ्र्यासाठीही खूप गोष्टी सोप्या झाल्या.


(गार्गी कॅनडात यॉर्क विद्यापीठाच्या शुलिक स्कुल  ऑफ  बिझनेस  इथं  शिकते.)


स्तब्ध रस्ता. गोठलेली शांतता - भाग्यश्री मुळे

मी राहते ते डार्टमाउण्ड हे जर्मनीतलं शहर फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. नेहमी गजबजलेले शहर आता  शांत आहे. फक्त हॉस्पिटल्स सुरू आहेत. दोन वर्षापूर्वी मी सेल बायोलॉजी याविषयी पीएच.डी. करण्यासाठी इथं आले. 
मॅक्स प्लॅक इन्स्टिटय़ूट ऑफ सेल बायोलॉजी जगप्रसिद्ध आहे. तिथली लॅब, अभ्यास, वीकेण्डला भ्रमंती असं माझं सगळं मजेत सुरूहोतं.
 मी अगदी मनापासून रमले होते. फक्त हिवाळा फार  फार तीव्र वाटतो. तसा तो आत्ताही आहे. मे उजाडला तरी. बाल्कनीतून, खिडकीतून  शांत, निस्तब्ध रस्ता दिसतो आहे. गोठलेली शांतता. 
कोरोनामुळे लॉकडाउन झालं आणि दिवस दिवस   सुस्त झाले. वाढणारा धोका जाणून प्रशासनानं विशेषत:   राष्ट्रप्रमुख अॅन्जेला  मर्केल  यांनी कठोर पाऊलं उचलली.
त्यात माझंही वर्क फ्रॉम होम सुरू झालं. प्रत्येक जण स्वत:च्या घरात बंदिस्त झाला. एरव्ही स्टेशनर्पयत  चालत जाणं मला फार छान वाटत असे. ते बंद झालं. मैत्रिणी,  सहकारी यांची रोजची भेट किती मोलाची आहे ते आता समजतं आहे.  आमच्या मीटिंग्स ऑनलाइन होतात. पण सेल बायोलॉजीविषय असल्यानं फार काम घरी होत नाही. 
लॉकडाउनच्या सुरुवातीला सुपर मार्केटमधील पिठे, ताजी फळे, भाज्या लवकर गायब व्हायला लागले. आम्हीसुद्धा हवाबंद अन्न जमेल तसं साठवलं.
माङया मैत्रिणीची आई पुण्यातून तिला भेटायला इथं आली. आम्हा सर्वाना त्यांना भेटून आनंद झाला; पण लॉकडाउनमुळे त्या येथेच अडकून पडल्यात. आम्हालाही त्यांना सध्या भेटता येत नाही. आणखी एका मित्नाची पत्नी आणि मुले चीनमध्ये होती. त्यांना भेटण्यासाठी तो गेला. आता हाँगकाँगमध्ये अडकला आहे.
लॉकडाउनअगोदर माझा एक चिनी सहकारी वुहान येथे सुट्टीसाठी गेला होता. ली त्याचं नाव, तो परत येतो आहे असं समजल्यावर आम्ही सर्वजण घाबरलो होतो. पण सुदैवाने त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. पुरेसे दिवस त्यानं विलगीकरणही केलं. आमच्या कॉर्डिनेटरने आम्हाला व्यवस्थित समजावलं. आमच्या इन्स्टिटय़ूटने सर्वाना फ्लेक्ङिाबल टाइम टेबल दिले होते. इतरही सर्व सहकार्य  ते करत असतात. आमचे स्टायपेण्ड अगदी वेळेत मिळते आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक अडचण येत नाही.
तरीही कोरोनाचे भय आणि दडपण प्रत्येकाच्या मनात आहे. एक अनिश्चितता सतावते.  नकळत कातर वेळेला घर आठवतं, आईची आठवण येते. डोळ्यात पाणी येतं.  


(भाग्यश्री जर्मनीत डार्ट माउण्ड या शहरात पीएच.डी. करतेय.)

Web Title: friends studying in Canada and Germany shares their lockdown story.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.