शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

बांध-काम- बिल्डिंग अँण्ड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री

By admin | Published: May 14, 2014 2:27 PM

‘त्रिशूल’मधला अमिताभ आठवतो? खिशात फुटकी कवडी नसताना, भलामोठा बिल्डर होतो.

‘त्रिशूल’मधला अमिताभ आठवतो? खिशात फुटकी कवडी नसताना, भलामोठा बिल्डर होतो. ‘शांती कन्स्ट्रक्शन’ नावाची कंपनी सुरू करतो आणि शर्टाला खिसाही नसताना मोठय़ा कॉन्फिडन्सने समोरच्याला दरडावतो, ‘मुझसे पांच मिनिट ना मिलकर, आपने अपना पाच लाख रुपये का नुकसान कर दिया है.‘
जरा फिल्मीच वाटतं ना हे सारं? पण पूर्वी जे फिल्मी वाटत होतं, ते आज सत्यात उतरू शकतं आणि त्या वास्तवाकडे दुर्लक्ष जर केलं तर मात्र पाच लाखचाच नाही तर एखाद्याचं जिंदगीभरचं नुकसान नक्की होऊ शकतं. कारण आजच्या घडीला भारतातला बांधकाम व्यवसाय हा प्रचंड वेगानं फोफावतो आहे. अर्थात हे सांगायला कुणा तज्ज्ञाची तरी गरज कशाला हवी? जरा अवतीभोवती नजर टाका लहान-मोठय़ा शहरांत वाटेल तेवढी घरं डेव्हलपमेण्टच्या नावाखाली बांधली जात आहेत. राहते बंगले पडून बहुमजली इमारती उभ्या राहताहेत. हे जे आपल्याला दिसतंय ते या क्षेत्रातल्या जगभरातल्या अभ्यासकांनाही दिसतं आहेच. ‘ग्लोबल कन्स्ट्रक्शन पर्सपेक्टिव्ह’ आणि ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ या दोन संस्थांनी केलेल्या एकत्रित अभ्यासाची आकडेवारी तरी हेच सांगते. २0२५ पर्यंत भारत हे जगातलं तिसर्‍या क्रमांकाची बांधकाम बाजारपेठ असेल. आगामी काळात भारतात दरवर्षी ११ कोटी ५0 लाख घरं बांधली जातील, असं या अभ्यासाचं म्हणणं आहे.  त्यातून वर्षाला सुमारे एक लाख कोटी डॉलर्स इतकी उलाढाल या व्यवसायात अपेक्षित आहे.
पैशाची गंगा ज्या व्यवसायात वाहतेय, त्याच्याकडे काय रेती-सीमेण्टच्या पाट्या वहायचं अशा नजरेनं पहायचं किंवा त्यापासून फटकून रहायचं हे म्हणजे संधीकडे पाठ फिरवणं आहे. आणि ही संधी म्हणजे ‘त्रिशूल’मधल्या विजयसारखं डायरेक्ट बिल्डरच होऊन कोट्यवधीचं भांडवलच उभं करायला पाहिजे हे कुणी सांगितलं.  क्रेन ऑपरेटर्सपासून, सुतार-गवंडी, प्लंबर्स, रंगारी असं काम करणारे शेकडो हात या व्यवसायला हवे आहेत.
 
 
सुतार आणि रंगारी
तसं हे काम काही नवीन नाही. शेकडो वर्षं ही कामं आपल्या अवतीभोवती होतात. कॉलेजात जाऊन कसले कोर्स न करताही अनेक जण पाहून पाहूनच ही कामं शिकतात. मात्र नव्या काळात ही कामं अधिक प्रोफेशनल होत जातील. अधिक कुशल आणि उत्तम प्रशिक्षित सुतार आणिं रंगकाम करणार्‍या व्यक्तींची बांधकाम क्षेत्राला गरज असेल. मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की, ज्या प्रमाणात ‘स्किल्ड’ व्यक्तींची बाजारपेठेला गरज आहे तसे कुशल रंगारी, सुतार अत्यंत कमी आहेत. आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी याच मुद्यावर सारं येऊन अडलं आहे.
 
 
क्रेन ऑपरेटर्स
उंचच उंच टॉवर बांधले जात असताना सामान लोड करून इकडून तिकडे उंचावरून जाणार्‍या क्रेन तुम्ही पाहिल्या असतीलच. आता तर जशा इमारती मोठय़ा होत आहेत तसे क्रेन ऑपरेटर्सची मागणी वाढत आहे. भारतातच नाही तर जगभरातलं हे क्षेत्र आहे. इतकी वर्षं या कामासाठी काही प्रशिक्षण मिळत नव्हतं आता तर भारतातही क्रेन ऑपरेटिंगचे कोर्सेस अगदी आयटीआयमध्येसुद्धा उपलब्ध आहेत. कुशल-प्रशिक्षित क्रेन ऑपरेटर ही बांधकाम व्यवसायातली नवीन महत्त्वाची गरज आहे.
 
गवंडी
गवंडी काम काय करायचं? ते काय शिकायचं असतं का, असं वाटण्याचा जमाना जुना झाला. बांधकाम व्यवसायात गवंडी काम करणार्‍यांचीही मोठी मागणी आहे. ती वाढत जाणार आहे. येत्या काळात तर आपल्याकडचे गवंडी टिकवून ठेवण्यासाठी ठेकेदारांना जीवाचं रान करावं लागेल, असा या क्षेत्रातल्या जाणकारांचा अंदाज आहे.
 
 
वेल्डर्स
वेल्डिंग असं म्हटलं की काय येतं तुमच्या डोळ्यासमोर. लाह्यांसारखं तडातड फुटणार्‍या आगफुलांचं फॅबिक्रेशनचं काम? पण आता वेल्डर्स हे एक मोठं करिअर होऊ घातलं आहे. त्यासाठी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग (ँ३३स्र://६६६.्र६ ्रल्ल्िरं.ूे/ नावाची संस्था भारतभर या क्षेत्राच्या प्रचार प्रसारासाठी काम करते आहे. वेल्डिंग या शाखेचा तंत्र म्हणून भारतभर प्रसार व्हावा. या क्षेत्रात भारतातच नाही तर जगभर निर्माण होत असलेल्या नवनव्या संधी प्रशिक्षित वेल्डर्सना मिळाव्यात म्हणून ही संस्था काम करते. भारतात अनेक ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत. पुण्याजवळ चिंचवड स्टेशन परिसरातही या संस्थेचे केंद्र आहे. 
वेल्डिंग क्षेत्राचा परीघ वाढत आहे, उत्तम वेल्डर्स नसतील तर जगभरचा ऑईल उद्योग ठप्प होईल, अशीही एक चर्चा आहे.
त्यामुळे आपल्या जवळच्या आयटीआयमध्ये जो वेल्डिंगचा ट्रेड आहे, त्याच्याकडेही एक मोठी कामाची संधी म्हणून पहायला हरकत नाही.
 
प्लंबर
दुर्दैवानं फुटलाच तुमच्या घरातला एखादा नळ, तर प्लंबरला फोन करून पहा. अर्जन्सी सांगा. तो किती वेळात येतो, त्याच्यापाठी किती लागावं लागतं याचा अनुभव घ्याच. मग घरी येताच प्लंबर म्हणेल तेवढे पैसे देऊन काम करूनच घ्यावं लागतं. 
काम तसं कष्टाचंच. मात्र बांधकाम व्यवसाय वाढीस लागलेला असताना प्लंबर मिळणं आणि लिकेज काढण्यापासून पाइपलाइन टाकण्यापर्यंतची कामं वेळेत करणं हे अधिक जिकिरीचं होत चाललेलं आहे. त्यामुळेच प्लंबर म्हणून काम करणार्‍यांना भविष्यात सुगीचे दिवस येतील, हे उघड.
 
 
इलेक्ट्रिशियन
तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये जाता, कधी प्रश्न पडलाय की या मल्टिप्लेक्सचं सगळं वायरिंग, फिटिंग, कुणी केलं असेल? कसं केलं असेल? मोठ्ठाले मॉल, दवाखाने, मल्टिप्लेक्स, विमानतळं ते आपलं घर सगळीकडे लाईट फिटिंगसाठी आवश्यक असलेल्या कुशल, प्रशिक्षित वायरमन, इलेक्ट्रिशियनची सध्या मोठी गरज आहे. बांधकाम व्यवसायात तर कुशल इलेक्ट्रिशियनला दणक्यात पैसे मोजले जातात.