coronavirus : worry surfing करताय? सारखं तपासताय आता काय झालं ? -मग  सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:58 PM2020-04-09T17:58:17+5:302020-04-09T18:00:22+5:30

करायचं काहीच नाही. फक्त चिंता करायची. त्या चिंतेच्या लाटेत मन काळजीनं पोखरतं आणि आपण फक्त सैरभैर होतो. हे असं एकाकी अस्वस्थ जगणं आलंय तुमच्या वाटय़ाला? मग जरा ‘कामाला’ लागा!

coronavirus : worry surfing- beware of it! it is dangerous for you in lock down. | coronavirus : worry surfing करताय? सारखं तपासताय आता काय झालं ? -मग  सावधान

coronavirus : worry surfing करताय? सारखं तपासताय आता काय झालं ? -मग  सावधान

googlenewsNext
ठळक मुद्देमनातील अस्वस्थता कशी हाताळायची आणि त्याला एकदम ‘रफ-टफ’ कसे करायचे?

डॉ. हमीद दाभोलकर 


‘Tough times do not last... but tough people do ..!’ - हा इंग्लिश भाषेतला सुविचार ऐकला आहे का ?  अडचणीच्या कालखंडात मानवी मनाला खूप उभारी देणारा हा विचार आहे .  ‘अडचणीचे कालखंड हे दीर्घ काळ टिकत नाहीत पण ज्यांचे मन खंबीर असते असे लोक दीर्घ काळ टिकतात’.
- असा या सुविचाराचा अर्थ होतो. कोरोनाच्या साथीमुळे आपण सारेच अस्वस्थ आहोत. त्या काळात या विचाराची गरज आहे.
आपण जर आपले मन खंबीर केले तर आपण या अवघड कालखंडावरदेखील मात करू शकू असा आशावाद हा विचार आपल्या मनात निर्माण करतो! 
मात्र मनातील अस्वस्थता कशी हाताळायची आणि त्याला एकदम ‘रफ-टफ’ कसे करायचे?
असा प्रश्न अनेकांना पडतो.
त्याचीच उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
करोनाची साथ ही अचानक कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आलेली आपत्ती आहे. गेल्या शंभर वर्षात अशा स्वरूपाची सर्वव्यापी आपत्ती जगाने पाहिलेली नाही. आपल्या व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या आयुष्यातील बहुतांश गोष्टींच्यावर परिणाम करणारी ही आपत्ती आहे. अनेक शंका कुशंकांनी आपले मन ग्रासले जाणो अगदी स्वाभाविक आहे. 
अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना तुम्ही सामोरे जात असाल. 
कुणाची अगदी तोंडावर आलेली परीक्षा पुढे गेली आहे, कुणाचे लग्न ठरलेले आणि त्यामध्ये ही अडचण आली आहे. अनेक मुले-मुली शिक्षण किवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला मोठय़ा शहरात आलेली तिथेच अडकून पडली आहेत. होस्टेलवर बांधून टाकल्यासारखे होते आहे. गावाकडे आई वडिलांचे आणि कुटुंबाचे कसे चालले असेल याची चिंता मनात आहे. खिशातले पैसे संपत आले आहेत.
अशा एक ना अनेक गोष्टीमुळे मनात अस्वस्थता येते. 
एकदा का चिंता मनात घर करायला लागली की छातीत धडधड होणो, सतत बेचैन वाटणो, झोप न लागणो, भूक मंदावणो, चिडचिड होणो अशा अनेक गोष्टी व्हायला लागतात. 
आपल्यातल्या कुणाला जर अशी काही लक्षणो येत असतील तर आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊया की या कालखंडात अशी अस्वस्थता वाटणारे आपण एकटेच नाही.
आपल्या आजूबाजूचे बहुतांश सर्वजण कमी अधिक प्रमाणात अशा भावना अनुभवत असतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील चिंता ही समुद्राच्या लाटेसारखी असते. समुद्राची लाट जशी हळूहळू वर जाते, एका सर्वोच्च बिंदूला पोहचते आणि मग खाली येते त्याचप्रमाणो ही चिंतेची लाट हळूहळू वर जाते एका सर्वोच्च त्रसदायक बिंदूला पोहचते आणि मग हळूहळू ओसरते. 
त्यामुळे ही चिंता ही तात्पुरती मनाला वाटणारी अवस्था आहे हे आपण लक्षात ठेवूया. या चिंतेच्या लाटेत बुडून न जाता त्यावर स्वार होणं हेच आपल्याला शिकायला लागते. 
समुद्रातील लाटेवर स्वार होऊन सर्फिग करणारे लोक तुम्ही पाहिले असतीलच.
अगदी तसेच आपल्याला आपल्या चिंतेच्या लाटेवर स्वार व्हायला शिकायचे आहे.
मानसशास्त्रच्या भाषेत याला worry surfing  असे म्हणतात. 
अनेकदा असे होते की चिंता आणि अस्वस्थता असह्य होऊ लागली की माणसे त्याच्या त्रसातून बाहेर पडण्यासाठी काही तरी निर्णय घेऊन टाकतात.
मन अस्वस्थ असताना घेतलेले हे निर्णय हे बहुतांश वेळा चुकतात. म्हणून आपण कुठलाही निर्णय घेण्यासाठी आपल्या चिंतेवर स्वार होऊन तिचा भर ओसरण्यासाठी वाट पाहायला हवी.
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.
करोनासारखे साथीचे आजार पसरले असताना आपलेदेखील अनेकदा असेच होते. 
थोडा कुठे खोकला आला, सर्दी झाली किंवा दमल्यासारखे वाटले तर मनात विचार यायला लागतात की मला कोरोना तर झाला नसेल ना? 
आपल्यातील पण काही जणांना असे वाटले असेल.
 शरीरात दुसरे काही छोटे-मोठे बदल झाले तरी आपल्याला लगेच मोठय़ा आजाराची भीती वाटू लागते. 
सातत्याने कोरोनाविषयी बातम्या पाहणो आणि त्याविषयी विचार करत राहणो यामधून असे होऊ शकते. 
घरगुती उपायांनी जर ही लक्षणो कमी नाही झाली तर आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला आपण नक्कीच घ्यायला पाहिजे.
पण आपली चिंता कमी करण्यासाठी करोनाच्या बातम्या बघणो त्याचा विचार करणो हेदेखील कमी करायला हवे.
दिवसातून आपण काही वेळ जर या बातम्या आणि विचारांसाठी राखून ठेवू शकलो तर उत्तम.

*****

जे आवडतं ते करा, कुणी अडवलं आहे?

घरी किवा होस्टेलमध्ये अडकलेल्या तरु णाईच्या समोर सध्या सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे एवढा रिकामा वेळ मिळाला आहे त्याचे काय करायचे ? 
किती गंमत आहे बघा मानवी मनाची ! 
जेव्हा आपल्याला मोकळा वेळ नसतो तेव्हा कधी एकदा मोकळा वेळ मिळेल असे वाटत असते. आता मोकळा वेळ मिळाला तर त्याचे काय करू असा प्रश्न पडतो.  जेव्हा आपण खूप बिझी असतो तेव्हा आपल्याला वेळ मिळाला तर आपण हे करू ..ते करू  असे  स्वप्नरंजन आपण मनातल्या मनात करत असतो. 
1. त्या गोष्टी सुरू करण्याची हीच  वेळ आहे हे आपण समजून घेऊया. 
आपल्यातील कुणाला रोजच्या व्यायामाची सवय शरीराला लावायची असेल.
कोणाला स्वयंपाक करायला शिकायचे असेल, कुणाला गाणो म्हणायचा रियाज करायचा असेल तर कुणाला चित्र काढायची असतील. 
अशा आपल्याला आवडणा:या गोष्टी करण्यासाठी यावेळेचा आपण नक्कीच वापर करू शकतो.
2. हे करताना एक गोष्ट मात्र पाळणो आवश्यक आहे की जर आपण घरात असू किवा होस्टेलच्या रूमवर असू तर आवश्यक असलेली सर्व कामे आपण वाटून घेवून करायला पाहिजेत.  नाहीतर आपल्याकडे असे होते की जेवण धुणी-भांडी कचरा काढणो ही सर्व कामे स्त्रियांनाच करायला लागतात.
3. स्त्री पुरु ष समानतेचे मूल्य आपल्यामध्ये रु जवायला कोरोनाची साथ ही एक इष्टापत्तीच झाली आहे असे आपण समजून घेऊ शकतो. 
4. स्वत:शी संवाद साधणो ही गोष्ट बहुतांश वेळा उद्यावरच ढकलत असतो. 
स्वत: कडे अंतर्मुख होऊन पाहणो, आपल्या स्वभावातील त्रसदायक गोष्टी समजून घेणो आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी नियोजन आणि प्रयत्न सुरु  करणो या गोष्टी करायला थोडी शांतता आणि अवकाश लागतो तो अवकाश या लॉकडाउनने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे.
त्याचा आपण आपल्या स्वत:शी स्वत:ची अधिक चांगली ओळख व्हायला उपयोग करून घेऊ शकतो.
6. या अस्वस्थतेच्या कालखंडात अनेक वेळा माणसे टोकाची स्वार्थी होतात.
मी आणि माङो एवढाच विचार करू लागतात. पण खास करून तरु ण मित्र मैत्रिणी ज्यांची प्रतिकारक्षमता चांगली असते त्यांनी स्वत:च्या पलीकडे समाजाचादेखील विचार करणो आवश्यक आहे. 
7. आपल्यापेक्षा अडचणीत असलेले अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात.  वृद्ध, निराधार, हातावर पोट असलेले मजूर अशी अनेक माणसे आपल्यापेक्षा अधिक अडचणीत आहेत.
अशा लोकांना मदत करणो हे तरु ण म्हणून आपले कर्तव्य तर आहेच त्याने आपले मनाचे समाधान वाढून स्वत:चे भावनिक स्वास्थ्यदेखील चांगले राहायला मदत होते.

****

तुम्हाला व्हायचंय का
भावनिक मदत कार्यकर्ता?


भावनिक अस्वस्थता असलेल्या लोकांना मदत देण्यासाठी  आम्ही मनोबल नावाची मोफत हेल्पलाइन चालवत आहोत.  
ज्या तरु ण मुलांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांना भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत याविषयीदेखील मोफत ऑनलाइन प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे.
1. तुम्हाला काही अडचणी असल्या अथवा या प्रयत्नात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचे असेल तर आम्हाला 
9665850769, 9561911320 या क्र मांकावर संपर्क करा.


(लेखक मनोविकारतज्ज्ञआणि अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)

 

Web Title: coronavirus : worry surfing- beware of it! it is dangerous for you in lock down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.