टिपिकल वाटेवर करिअरचा भोपळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:00 AM2019-08-08T07:00:00+5:302019-08-08T07:00:16+5:30

सायन्सला जायचं म्हणजे भारी, इंजिनिअरिंग-मेडिकल त्याहून भारी असं म्हणणारा काळ संपला, आर्ट्स-कॉमर्सवाल्यांना चांगले दिवस येत आहेत; पण त्यांनी नवीन स्किल्स शिकून घेतले तरच.

Career opportunity in new era, be alert! | टिपिकल वाटेवर करिअरचा भोपळा?

टिपिकल वाटेवर करिअरचा भोपळा?

Next
ठळक मुद्देथांबला तो संपला, बदलला तो जिंकला हे नव्या जगाचं सूत्र आहेच..

विनायक पाचलग 

हा लेख लिहिताना एक धक्कादायक बातमी आलेली आहे.
 ती म्हणजे यावर्षी चक्क एनआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांत जागा रिकाम्या राहिल्या आहेत. एनआयटी ही  इंजिनिअरिंगसाठी आयआयटीनंतरची देशातली दुसर्‍या क्रमांकाची संस्था आहे. सध्या इंजिनिअरिंग करणार्‍यांची अवस्था वाईट आहे हे आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येत होतंच; पण, थेट एनआयटीवर अशी वेळ आली याचा अर्थ इंजिनिअरिंगचे दिवस भरले असेच म्हणावे लागेल ! त्यामुळे, येथून पुढे इंजिनिअरिंगलाच फक्त डिमांड असते आणि ‘मेरा बेटा इंजिनिअर बनेगा’ या फेजमधून आपण  बाहेर पडायला हवं एवढं नक्की. कारण इंजिनिअरिंगच्या जगात जे चित्र आहे, ते विचार करायला लावणारं आहे.
बरं इंजिनिअरिंगची अवस्था अशी असताना त्याउलट यावर्षीही आर्ट्स आणि कॉमर्सची पुण्यातल्या प्रमुख कॉलेजेची कटऑफची टक्केवारी वाढली आहे. पुण्यातच कशाला अन्य शहरातही ही कटऑफ लिस्ट बरीच उंच झालेली आहे. आज जर का आपण फेसबुक, गूगल अशा कोणत्याही कंपन्या पाहिल्या तर तिथे जितके इंजिनिअर्स आहेत तितकेच सायकॉलॉजिस्ट, कण्टेण्ट रायटर, यूजर एक्सपिरियन्स एक्सपर्ट आहेत. या सगळ्यांचे बेसिक शिक्षण हे ह्युमनिटीजमधून झालेले आहे. थोडक्यात, आपल्या भाषेत ज्याला बी.ए., बी. कॉम केलेला आहे असे म्हणतो तो सध्या डिमांडमध्ये आहे. आमच्या स्वतर्‍च्या स्टार्टअपमध्येसुद्धा जेवढे पैसे आम्ही इंजिनिअरला देतो त्याहून जास्त पैसे आम्ही ‘यूजर एक्सपिरियन्स’ आर्टिस्टला देतो.
ही दोन्ही उदाहरणं द्यायचं कारण म्हणजे इंजिनिअर्सना डी मोटिव्हेट करणं नाही, किंवा घाबरवून टाकणं असं नाही. याचं चित्र एकच की ‘डिमांड व सप्लाय’ याचं गणित चुकलं की काय होते हे वास्तव बघणं आहे.
 आजही गावात, खेडोपाडय़ात इंजिनिअरिंग म्हणजे ‘लै भारी’ असा एक समज आहे. ते भारी आहेच; पण आर्ट - कॉमर्स वाईट नाही हे आता आपण समजून घ्यायला हवं. लोकांच्या मनात इंजिनिअरिंग आणि मेडिकल हेच भारी असा समज राहिल्याने कित्येकदा तरु णांना हव्या त्या क्षेत्नात जाता येत नाही. यातून दुसरा घ्यायचा धडा असा की, जिथे नोकर्‍या जास्त आणि माणसं कमी अशी परिस्थिती असते तिथे जॉब पटकन मिळतात व उत्पन्नही भरघोस मिळते. पण, याच्या उलट परिस्थिती झाली तर मास्टर्स करूनही फारसा पगार मिळत नाही. त्यामुळे आपले क्षेत्न निवडताना पुढल्या  10 वर्षात जॉब कोणत्या क्षेत्नात असतील यांचा अंदाज घेणं अत्यंत गरजेचे आहे. 
पण हे झालं भविष्याबद्दल, आता जे जॉब शोधत आहेत, त्यांनी काय करायचं? आपण, या उदाहरणातून हे शिकलं पाहिजे की, स्वतर्‍ला इंटर डिसप्लिनरी बनवणं गरजेचं आहे. तुम्ही समजा वेबसाइट डिझायनर असाल तर फक्त फास्ट आणि अ‍ॅक्युरेट कोडिंग सोबतच जर का तुम्हाला कोणते रंग वापरले की वेबसाइट चांगली दिसेल याचा अंदाज असेल तर ते अडेड अ‍ॅडव्हॉनटेज असेल. आणि जर का तुम्ही छान आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला बेसिक ‘एचटीएमएल’ ( प्रोग्रामिंगची एक भाषा) माहीत असेल तर तुम्हाला फायदा आहे. थोडक्यात काय तर आर्ट आणि सायन्स यांनी आता हातात हात घालून चालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्यालाही आता त्या दोघांना सोबत घेऊन जाणं मस्ट आहे.
सध्याचा महिना हा अ‍ॅडमिशन आणि जॉब बदल या दोन्हीचा पीक पिरिअड असतो. अशावेळी बदलते ट्रेंड माहीत असावेत म्हणून हा लेख प्रपंच. थांबला तो संपला, बदलला तो जिंकला हे नव्या जगाचं सूत्र आहेच..

***
भारताचं नवे शैक्षणिक धोरण येऊ घातलंय. त्याचा मसुदा रिलिज झालाय आणि लवकरच ते अस्तित्वात येईल. त्यात जे आमूलाग्र बदल आहेत त्यातला एक सर्वात मोठा बदल आहे तो म्हणजे आर्ट/कॉमर्स/सायन्स आणि प्रोफेशनल अशा ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम होत्या, त्या निघून जातील आणि इंटर डिसप्लिनरी डिग्री येतील. एव्हाना यावर्षापासून व्यावसायिक शिक्षणात लॅटरल थिंकिंग, अनलिटिकल थिकिंग, फॉरेन लँग्वेज अशा गोष्टी बर्‍याच कॉलेजेसनी समाविष्ट केलेल्याच आहेत, त्याने घडणारे बदल येत्या काही वर्षात दिसून येतील.

Web Title: Career opportunity in new era, be alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.