शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची डबलबेल मारा आणि चला नव्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:15 IST

मेंदूला खुराक देणार्‍या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाटेवर.

ठळक मुद्देआपला मेंदू कायम नवीन काहीतरी शोधत इव्हॉल्व्ह होत असतो. त्याला झकास तजेला मिळेल .

प्राची  पाठक 

शाळेत असेर्पयत चित्र जरा वेगळं असतं. शाळा जवळ असेल तर आपण हौशीनं सायकलनं शाळेत जातो. शाळा घरापासून थोडी लांब, दहा, पंधरा, वीस किलोमीटरवरच्या अंतरवर असेल, तर रोजची व्हॅन, रिक्षा वगैरे लावलेली असते. शाळा संपून कॉलेजात प्रवेश घेतला की मग मात्र आपल्याला नव्या बाइकचे वेध लागतात. सायकल, रिक्षा या गोष्टी कमीपणाच्या वाटायला लागतात. काहीही झालं तरी, कॉलेज अगदी पायी जाण्याच्या, दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर, आई-वडिलांची ऐपत नसली तरी ‘मला बाइकच पाहिजे’ असा हट्ट सुरू होतो. पालक बर्‍याचदा मुलांचा हा हट्ट पुरवतातही; पण तो जर पालकांना पुरवता आला नाही, तर आपले रुसवे-फुगवे सुरू होतात. त्याचा राग शिक्षणावर काढायला सुरुवात होते. ‘मला आता शिकायचंच नाही, गाडी असेल तरच मी कॉलेजला जाणार’ असं सांगून बर्‍याचदा पालकांना ब्लॅकमेलही केलं जातं; पण वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात नाही. त्यातही एक वेगळा आनंद, शिक्षण आणि अविस्मरणीय अनुभव मिळू शकतो, हे लक्षातच घेतलं जात नाही.  

* काय करता येईल?दर आठवडय़ात किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपल्याला प्रवास करता येईल. करून तर पाहा. सुरुवातीला जरा बोअरिंग वाटेल, त्रास होईल. दगदग वाटेल, चिडचिड होईल; पण त्याचीही सवय होईल. त्यातली मजा तर कळेलच, पण माणसंही कळायला लागतील.जे अगदी घरापासून गाडी घेऊन रोज बाहेर पडतात, त्यांना आपण सांगू शकतो की दर आठवडय़ात एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करून बघा. आपली गाडी आपल्यासाठी उपलब्ध नाहीये, असं समजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने, बसने, शेअर रिक्षाने, लोकलने कॉलेजला, जॉबवर जाऊन बघा. म्हणजे मुद्दा काय की आपल्या कम्फर्ट झोनमधून जरा बाहेर येऊन पाहा.  

* त्याने काय होईल?1- नेहमीपेक्षा वेगळे ऑप्शन्स काय आहेत, असतात, ते कळेल. 2- आपल्याही नकळत पर्यावरणाचा विचार होईल. 3- आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर ‘अरेच्चा, इथे हेही आहे की’ असा साक्षात्कार होईल ! 4- रूटीनला जरा ब्रेक मिळेल. नव्या वाटा कळतील. 5- आपला मेंदू कायम नवीन काहीतरी शोधत इव्हॉल्व्ह होत असतो. त्याला झकास तजेला मिळेल .