शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूत ऑनलाइन किडा

By admin | Updated: February 5, 2015 19:55 IST

सोमवार ठिकाण तेच. मुक्तांगणची ओपीडी गेल्या वेळेपेक्षा गर्दी कमी होती. मागच्या वेळेस जे सुखवस्तू पालक भेटले होते,

आनंद पटवर्धन , आनंदपथ अभ्यास गट,

पुणे muktanganawareness@gmail.com

 
सोमवार ठिकाण तेच. मुक्तांगणची ओपीडी गेल्या वेळेपेक्षा गर्दी कमी होती. मागच्या वेळेस जे सुखवस्तू पालक भेटले होते, त्यांचा शोफर आज दिसला नाही. आत गेलो तर उजव्या हाताला भिंतीला पाठ करून फक्त बाप-लेक बसलेले. मला बरं वाटलं. कारण मी असं ऐकलं होतं की, तरु ण मुलं एकदा कॉन्सेलिंगला येतात. आणि मग परत येण्याची तयारी नसते.

‘‘सगळ्यांना वाटतं समजलं आपल्याला सगळं.’’ - संदीपसरांनी मागच्या वेळी सांगितलेलं वाक्य आम्हाला आठवलं आणि म्हणूनच त्याला तिथं बघून मला बरं वाटलं. त्याच्या अगोदर बरेच जण रांगेत थांबलेले असल्यामुळे हळूहळू वाट पाहण्याचे त्रासिक भाव त्याच्या चेहेर्‍यावर उमटू लागले. आम्ही बाहेरच होतो. सध्या फक्त त्याच्या केसकडे लक्ष देणे हिच उत्सुकता होती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यातले अनेक प्रश्न माझ्यासकट माझ्या अनेक मित्रांशीही निगडित होते. 
अखेर ‘त्याची’ आत जाण्याची वेळ आली. मीही त्याच्याबरोबरच आत शिरलो.
‘‘फार वेळ बसावं लागलं असेल नं? बोअर झाला असशील?’’ संदीपसरांनी अगदी आपुलकीनं विचारलं.
‘नाही’   -त्यानं नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं.
‘कमाल आहे. तुझ्या पेशन्सचं कौतुक करायला पाहिजे. आमच्या इथे खरं तर इतर ठिकाणी असतात तशी मासिकं नाहीत, टीव्ही नाही तरी तू शांतपणे बसलास हे नक्कीच कौतुकास्पद आहे.’
‘त्यात काय. मी मित्रांशी चॅट करत बसलो. वेळ कसा गेला ते समजलेच नाही. इथं रेंज फार वीक आहे, सर.’ -तो पटकन म्हणाला.
‘ गुड, तुम्हाला जमतं बुवा हे सगळे. मला साधा मेसेज टाइप करण्यातच इतका वेळ जातो चॅट करणं काय जमणार! बरं, ते प्रश्न सोडवून झाले का तुझे?’
‘बाबांनी हे पाकीटच दिलंय.’
‘ मी तुझ्याबद्दल विचारतो आहे’
‘ सोडवलेत नं. हे पहा. सर, त्यातले बरेच प्रश्न मला लागूच नाहीत. ते नोकरदार आणि लग्न झालेल्या माणसांसाठी आहेत. ते सोडून मी उत्तरं लिहिली आहेत.’ 
‘गुड, तू हे प्रामाणिकपणे लिहिलं आहेस त्याबद्दल मी खूश आहे. पण मला सांग हे असं का होत असावं?
‘जर एफबीवर एखादा मित्र लाइव्ह भेटला, तर गप्पा होत राहतात. काहीकाही वेळा इतर मित्र पण जॉइन होतात. मग गप्पांचा कट्टा रंगतो. काही वेळा कनेक्शन इतकं स्लो असत की बस. मग वेळ कसा जातो ते समजतच नाही.’
‘पण त्यामुळे तू ठरवलेली कामं होत नाहीत त्याचं काय?’
‘मला कुठे काय काम असतं? घरात सगळ्या कामांना माणसं आहेत.’- त्यानं क्षणात उत्तर दिलं.
हे ऐकून तितक्याच वेगाने संदीपसरांनी पटकन विचारलं, ‘तुझ्या अभ्यासाला पण माणूस ठेवलाय वाटतं?’
तो गप्प बसला त्याला गप्प बसण्यावाचून दुसरं काही उत्तर देणं शक्यच नव्हतं. आता त्यानं आपणहून बॉल संदीपसरांच्या कोर्टात टाकला होता. ही अचूक संधी होती. इंटरनेट मोहजालात तो किती अडकला आहे ते तपासून पाहण्याची.
‘गुड, तू इतक्या प्रामाणिकपणे लिहिलं आहेस त्याचं मला बरं वाटलं. अनेकदा तझ्या वयाची मुलं खरं लिहायला घाबरतात. पण, खरं बोलण्याचं डेअरिंग तुझ्यात आहे. गुड.’ -सरांच्या चेहेर्‍यावर कौतुकाचे भाव होते.
‘तू कधी इंटरनेट अँडिक्शन डीस ऑर्डर हा शब्द ऐकला आहेस का?’ त्यांनी विचारलं. त्यानं नाही असे दाखवणारी मान हलवली. 
‘ मग तुला त्याबद्दल थोडी माहिती करून घ्यायला आवडेल का? ती तू समजून घ्यावीस असं मला वाटतं. त्यामुळे सर्वात प्रथम एक गोष्ट चांगली होईल, ती म्हणजे तुझे आई-वडिलांबरोबरचे वाद कमी होतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर आजारात्वर उपाययोजना केल्यामुळे पुढची वाट सोपी होईल!
-------------------------------------------
 
तासन्तास ऑनलाइन वाया?
 
‘त्यानं’ प्रश्नावली सोडवताना ज्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली होती ‘ती’ उत्तरं आणि सरांनी त्याच्याशी मारलेल्या गप्पा ऐकून वाटलं की, ‘हेच’ प्रश्न आपण आपल्यालाही विचारले तर आपण काय उत्तरं देऊ?
‘त्या’ प्रश्नावलीत एक प्रश्न असा होता की, 
अमुक इतका वेळ फक्त ऑनलाइन राहायचं असं तू मनात पक्कं ठरवतोस, पण ठरवलं त्यापेक्षा किती तरी जास्त वेळ तू ऑनलाइन असतोस असं होतं का?
या प्रश्नाला त्यानं ‘हो’ असं उत्तर दिलं होतं!
मनातल्या मनात आम्ही हा प्रश्न स्वत:लाही विचारला आणि उत्तर?
- तेच होतं, जे त्यानं दिलं होतं!
म्हणजे त्याच्यासारखं इंटरनेट अँडिक्शन आपल्यालाही जडलेलं आहे की काय?
अँडिक्ट असल्याचा कबुलीजबाब
 
 
आपण अँडिक्ट आहोत हे ‘त्यानं’ कबूल केलं आणि सांगितलं,
* मनात सतत ऑनलाइन राहण्याचा विचार, त्यामुळं त्याचंअभ्यासावर लक्ष कमी झालं आहे.
* तो रात्री  उशिरापर्यंत वी-चॅट वर असतो कारण यूएस. मधल्या मैत्रिणी तेव्हाच ऑनलाइन असतात.(आणि त्या फ्रँक बोलतात. रात्री आई-बाबा सतत डोकावून बघत नाही, हा आणखी एक फायदा हेदेखील त्यानं मान्य केलं.)
*एकही दिवस ऑनलाइन गेल्याशिवाय करमत नाही. खूप अस्वस्थपणा येतो. एकदा घरच्यांनी ब्रॉडबॅण्ड बंद केलं, फोनवरचं डाटा कनेक्शन काढलं तेव्हा आपण प्रचंड आरडाओरडा, आदळआपट केली हे त्यानं मान्य केलं.
* मी इंटरनेटशिवाय जगूच शकत नाही, हे त्याचं ठाम मत.