शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न पडतीलच अरे; पण पाऊल तर उचलावं लागेलच ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 08:00 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- अमेय वाघ

अमेय.. किती लहान दिसतोस अरे तू..  इतका कसा बारीक आहेस? त्यावर काहीतरी कर. आणि जरा चिडचिड कमी कर, त्याचा तुलाच फायदा होईल. तुझ्या मतांवर तू ठाम आहेस आणि ती मांडताना तू काहीसा अ‍ॅग्रेसिव्ह होतोस. अर्थात मतांवर ठाम आहेस ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु थोडं अ‍ॅग्रेशन कमी केलंस तर कदाचित तुझी मतं समोरच्याला शांतपणे सांगू शकशील. आणि त्यांना ती पटतीलही. तुला अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला जायचंय; परंतु हिंमत होत नाहीये. तिकडे आपलं कसं होईल, आपल्याला हवं ते आपल्याला करता येईल का, असे असंख्य प्रश्न तुझ्या मनात घुटमळताहेत, हे कळतंय मला. पण मी तुला एवढंच सांगतो की तुझ्या शंका, तुझे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, पण मित्ना, पुढे जाण्यासाठी कधीतरी पाऊल उचलावंच लागणार आहे. तू हे पाऊल उचलताना भविष्याचा विचार कर. अडचणी येतील त्यांना सामोरे जाण्याची ताकद तुझ्यात आहे, फक्त ती तू आजमावत नाहीयेस. ती एकदा आजमावून बघ, तुझं जग वेगळंच असेल. तू जे काम करतोय ते तू खूप मनापासून आणि निरागस भावनेने करतोस. कदाचित पुढच्या काही काळात ही निरागसता कमी होईल. परंतु ती जपण्यासाठी प्रयत्न कर. ती निरागसता हीच तुझी ताकद आहे.अजून एक, तुझ्या आयुष्यात तुला मिळालेलं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. ते  सांभाळून ठेव, ते प्रेम तुला ताकद देईल. तुला पुढे जाण्यासाठी मदत करेल. एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही मोठा झालास तरी दुसर्‍याला कमी समजू नकोस. तुझ्या कामाबरोबरच इतरांचं कामसुद्धा बघ, त्यातून नक्कीच तुला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. तुझ्यातली जिद्द आणि कामाप्रतिची तळमळ कायम ठेव. यश तुला मिळत राहील.