शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युसूफ पठाणची सटकली, प्रेक्षकाच्या श्रीमुखात लगावली

By admin | Updated: December 24, 2014 15:53 IST

रणजी सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाच्या शेरेबाजीने संतापलेल्या युसूफने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

बडोदा, दि. २४ - मैदानात आक्रमक खेळीने विरोधी गोलंदाजांची भंबेरी उडवणा-या युसूफ पठाणच्या आक्रमकपणाचा फटका एका प्रेक्षकालाही बसला. रणजी सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाच्या शेरेबाजीने संतापलेल्या युसूफने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे. 

बडोदा येथे सध्या रणजी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्ध बडोदा हा सामना सुरु आहे.बडोद्यातर्फे खेळणारा युसूफ पठाण आणि अंबाटी रायडू ही जोडी मैदानात फलंदाजी करत असताना एक तरुण प्रेक्षक जोरजोरात  शेरेबाजी आणि शिवीगाळ करत होता. याप्रकारामुळे युसूफ चांगलाच संतापला. बाद झाल्यावर युसूफ ड्रेसिंग रुममध्ये आला व त्याने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये बोलवून घेतले. तो तरुण येताच युसूफने त्याच्या श्रीमुखात लगावली. या घटनेमुळे ड्रेसिंग रुममध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शेवटी युसूफचा भाऊ इरफान पठाण तिथे आला व त्याने हे प्रकरण निस्तारले. 

दरम्यान, सामनाधिकारी प्रसंता मोहापात्रा यांनी या घटनेची माहिती बीसीसीआयला दिली आहे. बीसीसीआय याप्रकरणी युसूफवर बंदी आणि दंडात्मक कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.