शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध - मुदगल समिती

By admin | Updated: November 4, 2014 09:45 IST

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ - विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणा-यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचे नाव अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणा-या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हे आहेत. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुदगल समितीची नेमणूक केली होती. या समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात समितीने विश्वचषक विजेत्या संघातील एका भारतीय खेळाडूचे बुकींशी संबंध असल्याचे म्हटले आहे.  हा खेळाडू आता भारतीय संघाचा भाग नाही. तीन वर्षांपूर्वी एका फसलेल्याा 'फिक्सिंग'चा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय बेटिंगप्रकरणात गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता बिंदू दारा सिंह यांच्यामधील संभाषणातील आवाजही त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाल्याने मयप्पन आणि त्यांचे सासरे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  . 

अहवाल तयार करताना चौकशी समितीने चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडूंची चौकशी करुन मयप्पन, एन. श्रीनिवासन यांचा संघातील हस्तक्षेपाविषयी माहिती जाणून घेतली. या अहवालातील गोपनीयता उघड होऊ नये म्हणून समितीने खेळाडूंचे नाव जाहीर करण्याऐवजी त्यांना विशिष्ट क्रमांक दिला आहे. तर खेळाडूंना दिलेल्या विशिष्ट क्रमांकाची यादी संबंधीत न्यायाधीशांनाच दिली जाणार आहे.