शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान जिंकेल यंदाचा वर्ल्डकप - रोबोटचे भाकित

By admin | Updated: February 11, 2015 15:41 IST

यावर्षीचा वर्ल्डकप अफगाणिस्तानचा संघ जिंकेल असे भाकित न्यूझिलंडमधील एका रोबोटने व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ११ - शनिवारपासून सुरु होणा-या वर्ल्डकपच्या सामन्यांकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असतानाच यावर्षीचा वर्ल्डकप अफगाणिस्तानचा संघ जिंकेल असे भाकित न्यूझिलंडमधील एका रोबोटने व्यक्त केले आहे. अफगाणिस्तान संघाचा पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला असून तो पहिल्यांदाच वर्ल्डकपचे सामने खेळताना दिसणार आहे. रोबोटच्या या भाकितामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. न्यूझिलंडमधील कँटरबुरी विद्यापीठातील एचआयटी लॅबच्या एका विद्यार्थ्याने विकसित केलेल्या या रोबोटने हे भाकित केले आहे. हो, रोबोटने केलेले भाकित खरे वाटत नसले तरी या रोबोटमध्ये भाकित वर्तविण्याचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम आपण करीत असून क्रिकेटमध्ये नेहमीच अनपेक्षित निकाल लागल्याचे सांगत एकप्रकारे रोबोटच्या भाकिताला दुजोरा देण्याचे काम एड्यूअर्डो सँडोव्हल या विद्यार्थ्याने केले. मॅक्सीअन-सीरियनचा तत्वज्ञानी इकरम अंटाकी यांच्या नावावरुन आपण रोबोटचे नाव इकरम ठेवले आहे. २०१० साली झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपवेळी ऑक्टोपसने जी भविष्यवाणी वर्तविली होती त्यातून आपल्याला ही प्रेरणा मिळाली असल्याचे सँडोव्हलने सांगितले. वर्ल्डकपच्या सामन्याला शनिवारी सुरुवात होणार असून न्यूझिलंडविरुध्द श्रीलंका यांच्यात पहिला सामना होणार आहे. दरम्यान, बुधवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने अफगाणिस्तान संघाचा १५३ धावांनी पराभव केला होता.