शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलाची विजयी सुरुवात एमडीएफए फुटबॉल : आरसीएफने झुंजवले

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने एमडीएफए एलिट गटाची विजयी सुरुवात करताना राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) संघाला पराभवाचा धक्का दिला. मात्र यावेळी नौदलाला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अन्य एका सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने आक्रमक खेळ करताना ब्लिट्सक्रिगचा ३-० असा धुव्वा उडवला.

मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने एमडीएफए एलिट गटाची विजयी सुरुवात करताना राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) संघाला पराभवाचा धक्का दिला. मात्र यावेळी नौदलाला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अन्य एका सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने आक्रमक खेळ करताना ब्लिट्सक्रिगचा ३-० असा धुव्वा उडवला.
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनाच्या (एमडीएफए) वतीने कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नौदलाने विजयी सलामी दिली खरी, मात्र यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागले. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केरळ येथे झालेल्या जी. व्ही. राजा अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत बाजी मारलेल्या नौदलाने आपली विजयी मालिका कायम राखली. आरसीएफने सुरुवातीपासूनच भक्कम बचाव करताना नौदलाचे आक्रमण रोखताना मध्यंतराला सामना गोलशुन्य बरोबरीत राखला.
यानंतर नौदलाने आक्रमक चाली रचताना आरसीएफवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यशही आले आणि आरसीएफला चुक करण्यास भाग पाडून ७५व्या मिनिटाला पेनल्टी कीक मिळवली. या मिळालेल्या सुवर्णसंधीचा पुरेपुर फायदा उचलताना सुनील नाईकने निर्णायक गोल करुन नौदलाच्या १-० अशा विजयावर शिक्का मारला.
यानंतरच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना ब्लिट्झक्रेगचा एससीचा ३-० असा धुव्वा उडवला. शावेझ सुर्वे याने सर्वाधिक २ गोल नोंदवताना संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. तर राकेश मेनन याने एक गोल करुन सुर्वेला मोलाची साथ दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
........................................