विल्यम्सनला अखेरच्या कसोटीत खेळण्याचा विश्वास

By Admin | Updated: October 8, 2016 03:40 IST2016-10-08T03:40:52+5:302016-10-08T03:40:52+5:30

भारताविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी फिट होण्याचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्वास आहे.

Williamson believes in playing in the final Test | विल्यम्सनला अखेरच्या कसोटीत खेळण्याचा विश्वास

विल्यम्सनला अखेरच्या कसोटीत खेळण्याचा विश्वास


भारताविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी फिट होण्याचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्वास आहे. परिस्थिती आव्हानात्मक असली तरी संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया विल्यम्सनने आज (शुक्रवारी) व्यक्त केली. आजारपणामुळे त्याला कोलकाता कसोटीतून माघार घ्यावी लागली; त्यामुळे संघाची फलंदाजी कमकुवत झाली. विल्यम्सन म्हणाला, ‘‘आता मला चांगले वाटत आहे. तिसरी कसोटी खेळण्याची आशा आहे. दिवसागणिक माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.’’ विल्यम्सन पुढे म्हणाला, ‘‘भारत दौरा आव्हानात्मक असला, तरी आम्हाला चांगली कामगिरी करायला हवी होती. आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. जर आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली, तर जगातील कुठल्याही देशात अनुकूल निकाल मिळवू शकतो. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत पहिल्या डावात ३००पेक्षा अधिक धावा फटकावणे आवश्यक होते. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्ट्या तुलनेने वेगळ्या होत्या. भारतीय वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी कोलकाता कसोटीत जुन्या चेंडूने प्रभावी मारा केला.’’

Web Title: Williamson believes in playing in the final Test