शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजने पाकिस्तानला नमवले

By admin | Updated: November 4, 2016 04:18 IST

नाबाद ८७ धावांच्या विजयी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट्सने पराभव केला

शारजाह : सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (६०*) आणि शेन डोवरिच (६०*) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ८७ धावांच्या विजयी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे या विजयासह विंडीज संघाने १४ सामन्यांनंतर आपला पहिला विजय मिळवला. तर, पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.तिसऱ्या व अंतिम कसोटीत १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने चौथ्या दिवशी ५ बाद ११४ धावांची मजल मारली. अखेरच्या दिवशी ३९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेट-डोवरिच यांनी नाबाद राहताना संघाच्या पराभवाची मालिका खंडित केली. विंडीजने ४३.५ षटकांत ५ बाद १५४ धावा काढल्या.पहिल्या डावात नाबाद १४२ धावा काढणाऱ्या ब्रेथवेटने दुसऱ्या डावातही नाबाद अर्धशतक झळकावताना विंडीजच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. त्याला सातव्या क्रमांकावरील डावरिचने मोलाची साथ दिली.पाकिस्तानला पहिल्या डावात २८१ धावांवर उखाडल्यानंतर विंडीजने ३३७ धावा काढून ५६ धावांची आघाडी घेतली. यानंतर पाकिस्तानने २०८ धावा उभारून विंडीजला १५३ धावांचे लक्ष्य दिले. क्रेग ब्रेथवेटला या वेळी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. >संक्षिप्त धावफलक :पाकिस्तान (पहिला डाव) : सर्व बाद २८१ धावा.वेस्ट इंडीज (पहिला डाव) : सर्व बाद ३३७ धावा.पाकिस्तान (दुसरा डाव) : सर्व बाद २०८ धावा.वेस्ट इंडीज (दुसरा डाव) : ४३.५ षटकांत ५ बाद १५४ धावा (क्रेग ब्रेथवेट नाबाद ६०, शेन डोवरिच नाबाद ६०; यासिर खान ३/४०)