शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही गंभीरपणे टेनिस खेळतो : फेडरर

By admin | Updated: December 13, 2015 23:20 IST

सलग दोन वर्षे आयपीटीएलमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने ही स्पर्धा प्रदर्शनीय स्पर्धा नसल्याचे ठाम मत व्यक्त केले.

नवी दिल्ली : सलग दोन वर्षे आयपीटीएलमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने ही स्पर्धा प्रदर्शनीय स्पर्धा नसल्याचे ठाम मत व्यक्त केले. या स्पर्धेच्या भारत दौऱ्यामध्ये शनिवारी फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल या दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये अटीतटीचा सामना झाला. या सामन्यानंतर फेडररने आपले मत मांडले.ही स्पर्धा प्रदर्शनीय आहे का? या प्रश्नावर फेडररने आपले ठाम मत मांडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रदर्शनीय सामना म्हणजे काय? आॅस्टे्रलियामध्ये किड्स डे प्रदर्शनीय सामना रंगतो, ज्यामध्ये तुम्ही खेळता आणि स्कूबी डूसह वेळही घालवता. मात्र ही स्पर्धा स्कूबी डू नाही, त्यामुळे आम्ही गंभीरतेने टेनिस खेळतो हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत फेडररने मत व्यक्त केले. नदालविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी सुमारे १५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. हे सर्व टेनिसप्रेमी होते. त्यामुळे मुळात प्रेक्षक कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण याकडे कसे पाहतो यावरही खूप निर्भर असते. माझ्या मते हे अत्यंत गंभीर टेनिस आहे. त्याचबरोबर आपल्या संघातर्फे खेळताना थोडा आनंदही मिळतो, असेही फेडररने सांगितले.या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने स्पर्धा आकर्षक झाली आहे. याबाबतीत फेडरर म्हणाला, की एका संघात अनेक दिग्गजांना खेळताना पाहणे शानदार आहे. इतक्या चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी मी त्यांचे कौतुक करतो. कारण ते ज्या प्रकारे खेळ करीत आहेत, त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत आहे. वैयक्तिकरीत्या मला हे आवडते, त्यासाठी या स्पर्धेला प्रदर्शनीय म्हणा किंवा दुसरे काही, परंतु हे मजेदार आहे आणि यासाठीच मी पुन्हा येथे येणार. (वृत्तसंस्था)