शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चांगल्या स्थितीत : सोमदेव

By admin | Updated: September 19, 2015 04:00 IST

भारताला अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले-आॅफ लढतीत १-१ ची बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोमदेव देववर्मनने भारतीय संघ

नवी दिल्ली : भारताला अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले-आॅफ लढतीत १-१ ची बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोमदेव देववर्मनने भारतीय संघ चांगल्या स्थितीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.सोमदेवने चेक प्रजासत्ताकचा अव्वल खेळाडू जिवी वेस्लीचा ७-६, ६-४, ६-३ ने पराभव केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सोमदेव म्हणाला, ‘‘पहिल्या दिवशी १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर आम्ही सुस्थितीत असल्याचे म्हणता येईल. या लढतीत कुणीच आम्हाला दावेदार मानत नव्हते. पहिल्या दिवशी चेक प्रजासत्ताक संघाला १-१ ने बरोबरीत रोखणे निश्चित सुखद आहे. मी आजच्या विजयावर खुश आहे.’’सोमदेव पुढे म्हणाला, ‘‘शनिवारी दुहेरीच्या लढतीत आम्ही निश्चितच दावेदार म्हणून उतरणार आहोत. लिएंडर पेस व रोहन बोपन्ना आम्हाला आघाडी मिळवून देतील, अशी आशा आहे. रविवार एकेरीच्या परतीच्या लढतीत पुन्हा एकदा चेक प्रजासत्ताक संघ दावेदार राहील. त्याच्या भात्यात अद्याप शस्त्र शिल्लक आहे. केवळ दुहेरीतच नाहीतर रिव्हर्स सिंगल्समध्येही ते काही बदल करू शकतात.’’आपल्या कामगिरीबाबत आनंद साजरा करताना सोमदेव म्हणाला, ‘‘मी नक्कीच खुश आहे. मी आज सर्व्हिसमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. तुमच्याकडून विजयाची आशा नसेल तर तुमच्यावर दडपण येत नाही. त्याचा मला लाभ मिळला. मी नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. माझी सर्व्हिस चांगली होती. दुसऱ्या प्रयत्नातील माझी सर्व्हिसही चांगली झाली. बेंचवर असलेले माझे सहकारी मला सातत्याने सल्ला देत होते. त्यामुळे माझे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली.