शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट’ रूपाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 10, 2014 04:45 IST

विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडीत काढेल, अशी एकवेळ जाणकारांनी शक्यता वर्तविली होती

नवी दिल्ली : विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडीत काढेल, अशी एकवेळ जाणकारांनी शक्यता वर्तविली होती; मात्र सध्या हा स्टार फलंदाज बॅडपॅचमधून जात आहे़ विंडीज विरुद्धच्या पहिल्या वन-डेतही तो फ्लॉप ठरला;मात्र आता पुढच्या वन-डे सामन्यांमध्ये क्रीडाप्रेमींना त्याच्या ‘विराट’ रूपाची प्रतीक्षा आहे़ इंग्लंड दौऱ्यातही विराटला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती़ त्यामुळे विंडीज विरुद्धच्या मायदेशातील वन-डे मालिकेत त्याच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा होती; मात्र पहिल्याच वन-डेत तो अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला़ त्याला गत १६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये १७़०६ च्या सरासरीने केवळ २५६ धावाच करता आल्या आहेत़ त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे़ इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील १० डावांमध्ये विराटला १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० असा स्कोअर करता आला होता, तर चार वन-डे सामन्यांत या फलंदाजाची कामगिरी ०, ४०, नाबाद १ आणि १३ धावा अशी झाली होती़ वन-डे मालिका भारताने ३-१ अशी जिंकली असली तरी विराट मात्र सपशेल फ्लॉप ठरला होता़विराटने जेव्हा भारतीय क्रिकेट संघात एन्ट्री केली होती, तेव्हा त्याने आपल्या प्रभावी खेळाने सर्वांचीच वाहवा मिळविली होती़ त्यामुळे हा फलंदाज सचिनच्याही पुढे निघून जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती;मात्र सध्या विराटचे दिवस फिरले आहेत. तो प्रत्येक धाव काढण्यासाठी झगडताना दिसत आहे़ विराटने आतापर्यंत १३९ वन-डेत देशाचे प्रतिनिधित्व करताना ५०़८० च्या सरासरीने १९ शतके आणि ३० अर्धशतकांसह ५६९० धावा बनविल्या आहेत़ या अनुभवी खेळाडूने आपले अखेरचे शतक यावर्षी २६ फेब्रुवारीला बांगलादेशाविरुद्ध झळकावले होते; मात्र त्यानंतर हा खेळाडू कसोटी आणि वन-डेत सतत फ्लॉप ठरत आहे़ त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे़ (वृत्तसंस्था)