फेनेस्ता ओपन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विष्णू, रियाला जेतेपद

By Admin | Updated: October 9, 2016 04:39 IST2016-10-09T04:39:10+5:302016-10-09T04:39:10+5:30

अग्रमानांकित विष्णू वर्धन आणि रिया भाटिया यांनी शनिवारी आपापल्या गटातील अंतिम सामने जिंकून फेनेस्ता ओपन राष्ट्रीय टेनिस विजेतेपद पटकावले.

Vishnu, Riala win title at the Fenesta Open National Tennis Tournament | फेनेस्ता ओपन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विष्णू, रियाला जेतेपद

फेनेस्ता ओपन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विष्णू, रियाला जेतेपद

नवी दिल्ली : अग्रमानांकित विष्णू वर्धन आणि रिया भाटिया यांनी शनिवारी आपापल्या  गटातील अंतिम सामने जिंकून फेनेस्ता ओपन राष्ट्रीय टेनिस विजेतेपद पटकावले. पुरुष गटात विष्णू याने डीएलटीए स्टेडियममध्ये शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात सिद्धार्थ विश्वकर्मा याने ६-३, ६-४ असा पराभव केला. महिला गटात रिया भाटिया हिाने अंतिम सामन्यात सहावी मानांकित एती माहेताला कडव्या संघर्षानंतर ७-६, ६-३ असे पराभूत केले.
१८ वर्षे आतील मुलांच्या गटात तिसरा मानांकित नितीन कुमार सिन्हा याने ध्रुव सुनिषला ६-३, ६-४ असे पराभूत केले. तर, १८ वर्षांखालील गटात तिसरी मानांकित अकांक्षा भानने हुमेरा शेकला ६-०, ६-२ ने पराभूत केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Vishnu, Riala win title at the Fenesta Open National Tennis Tournament