शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

विराटची फलंदाजी अदभुत, असामान्य या शब्दांपलीकडे - सुनील गावस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 14:08 IST

विराटच्या फलंदाजीचे वर्णन करायला अदभुत, असामान्य हे शब्द अपुरे आहेत. त्याची फलंदाजी या शब्दांपलीकडे आहे अशा शब्दात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराटचे कौतुक केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - विराटच्या फलंदाजीचे वर्णन करायला अदभुत, असामान्य हे शब्द अपुरे आहेत. त्याची फलंदाजी या शब्दांपलीकडे आहे अशा शब्दात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराटचे कौतुक केले आहे. आजच्या घडीला विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवून भारताला दिमाखात उपांत्यफेरीत पोहोचवणा-या विराट कोहलीवर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजच्या घडीला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्याची फलंदाजी थक्क करुन सोडणारी आहे असे गावस्कर एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले. 
 
कोहली दबावाखाली सर्वोत्तम खेळ करतो आणि संघ हिताला प्रथम प्राधान्य देतो हा त्याचा विशेष गुण आहे. संघाला धावांची गरज असताना किंवा धावांचा पाठलाग करताना तुम्ही कोहलीचा रेकॉर्ड बघा. त्याने प्रत्येकवेळी सामना जिंकून दिला आहे. तो निस्वार्थीपणे खेळतो. 
जेव्हा तुम्ही अशी मोठी इनिंग खेळता तेव्हा विजयी फटका मारण्याची तुमची इच्छा असते. पण कोहलीने स्ट्राईक धोनीकडे दिले. तो पूर्णपणे संघासाठी खेळतो अशी स्तुतीसुमने गावस्कर यांनी कोहलीवर उधळली.