शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विराट उत्कृष्ट अ‍ॅथलिट

By admin | Updated: June 15, 2016 05:17 IST

विराट कोहली हा अत्यंत व्यावसायिक खेळाडू असून एक उत्कृष्ट अ‍ॅथलिटही आहे, असे गौरवोद्गार टीम इंडियाचे फिटनेस कोच शंकर बासू यांनी काढले.

नवी दिल्ली : विराट कोहली हा अत्यंत व्यावसायिक खेळाडू असून एक उत्कृष्ट अ‍ॅथलिटही आहे, असे गौरवोद्गार टीम इंडियाचे फिटनेस कोच शंकर बासू यांनी काढले.टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे फिटनेस कोच म्हणून काम पाहणारे बासू यांच्यानुसार कोहली सर्वांत तंदुरुस्त खेळाडू असून, त्याचे लक्ष्य सर्वश्रेष्ठ खेळाडू बनण्याचे आहे. यासाठी तो खडतर मेहनतही घेत आहे. बासू म्हणाले, ‘‘कोहली जगातील सर्वश्रेष्ठ अ‍ॅथलिट बनण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही मर्यादा नाही. त्याच्यासमोर अनेक आदर्श असून, कोहली प्रतिस्पर्ध्यांना कधीही घाबरत नाही. अनेक अ‍ॅथलिट आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षकांना देतात; मात्र कोहलीसारख्या असाधारण खेळाडू मिळाल्याचा मला गर्व वाटतो.’’त्याचप्रमाणे, ‘‘कोहली जर तुमच्या कामावर खूष असेल तर तो कधीच तुम्हाला आव्हान देणार नाही. तो कितीही मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या खेळाडूंपैकी आहे. न्यूट्रीशन आणि नियम या बाबतींत तो काटेकोर आहे. त्याने आपल्या आयुष्यात अनेक बदल केले असून, मी केवळ त्याला योग्य दिशेने कूच करण्यास मदत केली आहे,’’ असेही बासू यांनी सांगितेले.नुकताच झालेल्या आयपीएलमधील कोहलीच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, ‘‘कोहलीने एकदा आपल्या खेळाविषयी म्हटले होते, की तो इतर खेळाडूंसारखे षटकार मारू शकत नाही. यंदाच्या आयपीएलवर नजर टाकल्यास त्याने ३८ षटकार मारले असून, गेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा १५ षटकार अधिक मारले आहेत. यावरून त्याच्या अंगी असलेल्या ताकदीचा अंदाज येतो. ज्या वेळी कोहली आरसीबीसह जोडला गेला, त्या वेळेपासून तो आपल्या तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेत आहे.’’ (वृत्तसंस्था)आजच्या काळातील युवा क्रिकेटर फॉलोअपवर अधिक भर देतात. एके काळी क्रिकेटर काही मस्ती-मजा करायाचे; मात्र सगळेचे असे नव्हते. अनेक क्रिकेटपटू शिबिर झाल्यानंतर फॉलअपविषयी चर्चा करतात; त्यामुळे मला अधिक मेहनत घ्यावी लागते, असे मला अजिबात वाटत नाही. याचे सर्व श्रेय भारतीय क्रिकेटरना जाते. कारण, जी ‘भूक’ मी भारतीय क्रिकेटरमध्ये पाहिली आहे, ती अविश्वसनीय आहे. - शंकर बासू