शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीत सूर गवसेल: कपिल

By admin | Updated: May 17, 2017 19:34 IST

इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 : इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी बुधवारी व्यक्त केला.कपिल म्हणाले,ह्यविराटच्या कर्तृत्वावर मला विश्वास असल्याने त्याच्या खेळावर शंका घेणे मला पटत नाही. सध्या तो चांगला खेळत नसला तरी लवकरच धावा काढेल. तो धावा काढायला लागेल तेव्हा संघातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. कर्णधार फॉर्ममध्ये असेल तर इतरांसाठी ते चैतन्यदायी ठरते.  कोहलीने मागच्या सत्रात १६ कसोटी सामन्यात ९७३ धावा केल्यानंतरआयपीएलमध्ये दहा सामन्यात केवळ ३०८ धावा ठोकल्या. चॅम्पियन्समध्ये गतविजेत्या भारताला पहिला सामना ४ जून रोजी पाकविरुद्ध खेळायचा आहे. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कपिल पुढे म्हणाले,डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचा मारा निर्णायक ठरेल. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा खेळाडू इतका पुढे जाईल, असे वाटलेही नव्हते. पण तो मानसिकदृष्टया कणखर असा गोलंदाज आहे. बुमराहसारख्या युवा खेळाडूला पाहिले की याची जागा अन्य कुणी घेऊ शकेल,असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करतात. फिरकीत अश्विन आणि रवींद्र जडेजा हे देशाचे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे कपिल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ कागदावर तरी बलाढ्य वाटतो आहे. पण माझ्यामते यंदा भारतीय संघ खरोखर भक्कम असाच आहे. महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंग यांच्या अनुभवाचादेखील लाभ मिळणार असल्याचे कपिल यांना वाटते. या दोघांनी क्षमतेनुरूप कामगिरी करीत युवा खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करायला हवा, असे कपिल यांचे मत आहे. भारत- पाक सामन्याबद्दल ते म्हणाले,ह्यभारतीय संघ सरस असून चांगला खेळ करीत आहे. दुसरीकडे पाककडे गमविण्यासारखे काहीच नसल्याने सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पण भारत बाजी मारेल, असे कपिल यांनी सांगितले