शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

By admin | Updated: January 1, 2016 05:42 IST

बीसीसीआयतर्फे गुरुवारी जाहीर झालेल्या पुरस्कारात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. ५ जानेवारी रोजी

नवी दिल्ली : बीसीसीआयतर्फे गुरुवारी जाहीर झालेल्या पुरस्कारात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. ५ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात महिलांमध्ये हा पुरस्कार मिताली राजला प्रदान करण्यात येईल.आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधारपद सांभाळणाऱ्या २७ वर्षीय फलंदाज कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली काही चांगले निकाल दिले. मितालीने यंदाच्या मोसमात वन-डेमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय व एकूण दुसरी महिला फलंदाज ठरली. मितालीला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी एम. ए. चिदंबरम ट्रॉफी देण्यात येईल. कर्नाटकच्या रॉबिन उथप्पाला रणजी स्पर्धेत सर्वाधित धावा फटकावण्यासाठी माधवराव शिंदे पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्याने ११ सामन्यांत ५०.६६ च्या सरासरीने ९१२ धावा फटकावल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या पुरस्कारासाठी कर्नाटकचा आर. विनयकुमार व मुंबईचा शार्दुल ठाकूर यांची निवड करण्यात आली. (वृत्तसंस्था)पुरस्कार विजेतेकर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार : सय्यद किरमाणीपॉली उमरीगर पुरस्कार : विराट कोहलीलाला अमरनाथ पुरस्कार (रणजी ट्रॉफी २०१४-१५ या मोसमातील सर्वोत्तम अष्टपैलू) : जलज सक्सेना (मध्य प्रदेश)लाला अमरनाथ पुरस्कार (स्थानिक मर्यादित षटकांचे क्रिकेट : सर्वोत्तम अष्टपैलू) : दीपक हुड्डा (बडोदा)माधवराव शिंदे पुरस्कार (सर्वाधिक धावा) : रॉबिन उथप्पा (कर्नाटक).माधवराव शिंदे पुरस्कार (सर्वाधिक बळी ) : आर. विनय कुमार (कर्नाटक) आणि शार्दुल ठाकूर (मुंबई).एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर-२३ गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) : अल्मस शौकत (उत्तर प्रदेश).एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर -१९ गटातील सर्वोत्तम खेळाडू) : अनमोलप्रीतसिंग (पंजाब). एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर-१६ गटातील सर्वोत्तम खेळाडू) : शुभम गिल (पंजाब)एम. ए. चिदंबरम ट्रॉफी (२०१४-१५ मोसमातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू) : मिताली राज (रेल्वे).एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (ज्युनिअर गटातील सर्वोत्तम महिला खेळाडू) : देविका वैद्य (महाराष्ट्र).सर्वोत्तम पंच (स्थानिक क्रिकेट) : ओ. नंदन. सर्वोत्तम कामगिरी : कर्नाटक क्रिकेट संघटना (१४ गुण).