सोशल मिडीयावर विराट पुन्हा अनुष्काचा फॉलोअर

By Admin | Updated: May 2, 2016 17:19 IST2016-05-02T15:01:04+5:302016-05-02T17:19:11+5:30

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेमसंबंधातील चढ-उतार अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा जवळ येत आहेत.

Virat Kohli again Anushka's follow-up on social media | सोशल मिडीयावर विराट पुन्हा अनुष्काचा फॉलोअर

सोशल मिडीयावर विराट पुन्हा अनुष्काचा फॉलोअर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेमसंबंधातील चढ-उतार अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा जवळ येत आहेत. सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या विराट आणि अनुष्काने परस्परांना अनफॉलो केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
 
विराटने टि्‌वटर आणि इन्स्टाग्रामवर अनुष्काला अनफॉलो केले होते. पण आता विराटने अनुष्काला सोशल मिडीयावर फॉलोकरुन बर्थ डे गिफ्ट दिले आहे. 
 
काही दिवसांपूर्वी दोघांनी एकत्र डिनर केल्याचीही चर्चा होती. विराट आणि अनुष्का पुन्हा एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. 

Web Title: Virat Kohli again Anushka's follow-up on social media