शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विकास गौडा आॅलिम्पिकसाठी पात्र

By admin | Updated: December 13, 2015 02:41 IST

भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आॅलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स प्रकारात खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी पात्रता निकष

नवी दिल्ली : भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आॅलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स प्रकारात खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे गौडाला पात्रता गाठता आली.रिओ आॅलिम्पिकसाठी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्रता निकषांतर्गत पुरुषांच्या थाळीफेकसाठी ६६ मीटर हे निकष ठरविण्यात आले होते. अलीकडे आयएएएफने हे अंतर कमी करून ६५ मीटरपर्यंत आणले. गौडाने मे महिन्यात जमैका आमंत्रित अ‍ॅथलेटिक्समध्ये ६५ मीटर थाळीफेक केली होती. सध्याचा आशियाई विजेता ३२ वर्षांचा गौडाने ९ मे रोजी किंग्स्टन येथे ६५.१४ मीटर थाळीफेक करीत आयएएएफची मंजुरी असलेली स्पर्धा जिंकल्याने तो रिओसाठी पत्र ठरला आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे महासचिव के. सी. वाल्सन यांनी गौडा रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. वाल्सन म्हणाले, ‘‘जमैकाची स्पर्धा आयएएएफची मान्यताप्राप्त स्पर्धा होती, शिवाय या स्पर्धेचे आयोजन पात्रता निकष बदलल्यानंतर झाले. गौडा आता रिओ आॅलिम्पिकमध्ये थाळीफेक करण्यास सज्ज आहे. तो ६५ मीटरपेक्षा अधिक थाळीफेक करू शकल्यास पदक जिंकण्याची शक्यता निर्माण होईल.’’ (वृत्तसंस्था) सपना, नितेंद्र रावतही पात्र!गौडासोबतच पायी चालण्याच्या शर्यतीतील खेळाडू सपना आणि पुरुष मॅरेथॉनपटू नितेंद्रसिंग रावत हेदेखील रिओसाठी पात्र ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सपनाने १ तास ३५ मिनिटे ३६ सेकंद वेळ नोंदवित रिओसाठी पात्रता गाठली होती. याशिवाय जपानच्या नोमी सिटीत झालेल्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत सपना चौथ्या स्थानावर आली. आॅलिम्पिक पात्रता निकष १ तास ३५ मिनिटे असे आहेत. रावतने गेल्या महिन्यात दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांच्या गटात विजेतेपदाचा मान मिळविला. कोरियात त्याने ११ आॅक्टोबर रोजी विश्व सैनिकी क्रीडा स्पर्धेत २ तास १८ मिनिटे ६ सेकंद वेळ नोंदविली होती. यंदा पात्रता निकष २ तास १७ मिनिटे बदलून २ तास १९ मिनिटे असा करण्यात आला.