शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO-मुंबईचा नयन ठरला स्पीडस्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 01:54 IST

राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशीपमध्ये वरिष्ठ गटात मुंबईच्या नयन चॅटर्जीने चमकदार कामगिरी करीत बाजी मारली.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 21 - पावसाचा शिडकावा.. मध्येच सूर्यनारायणाचे दर्शन... प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या आणि प्रोत्साहन अशा उत्साही वातावरणात रंगलेल्या राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशीपमध्ये वरिष्ठ गटात मुंबईच्या नयन चॅटर्जीने चमकदार कामगिरी करीत बाजी मारली. ‘लोकल बॉय’ चित्तेश मंडोडीने अनपेक्षितपणे दुसरे स्थान काबिज करुन कोल्हापूरकरांना जल्लोष करण्याची संधी दिली. याचबरोबर ज्युनिअर गटात यश आराध्य याने तर मायक्रो गटात अर्जुन नायर विजेते ठरले.कोल्हापूरजवळील हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अ‍ॅकडमीच्या ट्रॅकवर १३ व्या जे. के. टायर-एफएमएसीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशीपची रविवारी अंतिम फेरी पार पडली. या फेरीचे वैशिष्ट्ये म्हणजे गेल्या तीन फेरीचा विजेता रिकी डॉनीसन त्याला टक्कर देणारा कोल्हापूरचा ध्रुव मोहिते हे कारमध्ये झालेल्या बिघाडामुळे शर्यत पूर्ण करु शकले नाहीत.सिनिअर गटात सहाव्या स्थानावरुन सुरवात करणाऱ्या नयन चॅटर्जीने पहिल्यापासूनच आघाडी घेतली. पाचव्या लॅपपर्यंत तो पुढे होता. त्यानंतर थोडा मागे पडला, पण लगेच त्याने लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले शेवटी त्याने २0 मिनिटे ३४.८४२ सेकंदाची वेळ नोदवून पहिला क्रमांक मिळवला.कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने थोड्या वेळासाठी आकाशला मागे टाकत आघाडी घेतली तेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष केला. परंतु नयनने पुन्हा त्याला मागे टाकले. ध्रुव मागे पडू लागला. १२ व्या लॅपनंतर तो बाहेर पडला. ध्रुवने निराशा केली असली तरी चित्तेश मंडोडीने कोल्हापूरकरांना जल्लोषाची संधी दिली. जवळजवळ दोन वर्षानंतर ट्रॅकवर पुनरागमन करणाऱ्या चित्तेशने जबरदस्त कामगिरी करुन दुसरे स्थान पटकावले. त्याने २0 मिनिटे ४0.४९४ सेकंदाची वेळ नोंदवली. २0 मिनिटे ४५.४0३ सेकंदाची वेळ नोंदवणारा आकाश गौडा तिसऱ्या स्थानावर राहिला. जुनिअर मॅक्स गटात बेंगळूरचे वर्चस्व राहिले. यश आराध्य याने पहिल्या क्रमांकावर कब्जा मिळवला. चिराग घोरपडे दुसऱ्या स्थानावर तर पॉल फ्रान्सिस तिसऱ्या स्थानावर राहिला. या गटात आतापर्यंतच्या तिन्ही फेऱ्यातही आघाडी घेतलेल्या मानव शर्माला आजच्या चौथ्या फेरीत अपयश आले असले तरी त्याच्या एकूण गुणसंख्येत फरक पडलेला नाही.मायक्रो गटात आग्य्राचा शाहान अली आघाडीवर होता, परंतु पाऊस आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. याचा फायदा घेत बंगळूरुच्या अर्जुन नायरने पहिले स्थान मिळवले. या गटात बंगळूरुचाच यश मोरे तिसऱ्या स्थानावर राहिला.विजेत्यांना आण्णासाहेब मोहिते, शिवाजी आणि मोनिका मोहिते, अभिषेक आणि रिधिमा मोहिते यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

रिकी दुसऱ्या स्थानावर घसरलाया वर्षीच्या तिन्ही फेऱ्या जिंकणारा रिकी डॉनिसन हा या फेरीतही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात होता. पण रेसच्यावेळेस वरुन पडणारा पाउस आणि त्यामुळे ओला झालेला ट्रॅक याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. त्याच्या कार्टमध्ये बिघाड झाल्याने तो बाजूला झाला, काही वेळानंतर दुसऱ्या कारसह तो पुन्हा रेसमध्ये आला परंतु तोपर्यंत संयोजकांनी त्याला अयोग्य घोषित केले होते. या फेरीत त्याला केवळ ३८ गुणांवर समाधान मानावे लागले. आता तो एकूण ३२४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.