शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा दिल्लीवर 80 धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: May 15, 2016 23:39 IST

मुंबई इंडियन्सनं चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला

 ऑनलाइन लोकमत

विशाखापट्टणम, दि. 15 - मुंबई इंडियन्सनं चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सनं दिलेलं 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सची पुरती तारांबळ उडाली. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सला सर्व गडी गमावून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून डी कॉकनं शानदार खेळी करत 4 चौकारांसह 2 षटकार ओढत 40 धावा केल्या. तर पंतनेही डी कॉकच्या मागोमाग 23 धावांची खेळी केलीय. मुंबई इंडियन्सकडून बुमराहनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर ड्युमिनी, पंत आणि मिश्राला माघारी पाठवले. तर पंड्या, हरभजन सिंग, विनयकुमारनं प्रत्येकी एक बळी मिळवून दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या धावसंख्येला लगाम घातला. मुंबईने निर्धारित 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 206 धावांचा उभा केलेला डोंगर पाडण्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला अपयश आलं आहे. 
तत्पूर्वी कृणाल पांड्याच्या 86 धावांच्या झंझावती खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. कृणाल पांड्याने 37 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकार लगावत केलेल्या शानदार 86 धावा मुंबईच्या इनिंगचं आकर्षण ठरलं. रोहित - गुप्टिलने 46 धावांची सलामी दिली. रोहितने 21 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. गुप्टिलने संयमी फलंदाजी करताना 42 चेंडूत 48 धावांची खेळी केली. गुप्टिल आणि कृणाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. गुप्टिल, कृणाल बाद झाल्यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात पोलार्डही लगेच तंबूत परतला. शेवटच्या षटकात रायडूने 5 चेंडूत 13 तर बटलरने 9 चेंडूत 18 धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या 200 पार केली.