शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वेगाचा बादशहा थांबला

By admin | Updated: August 21, 2016 05:20 IST

जगातील सर्वात वेगवान धावपटू, अविश्वसनीय अ‍ॅथलिट आणि स्वत:ला ‘दिग्गज’ संबोधणारा जमैकाच्या युसेन बोल्टने आपले स्वप्न पूर्ण करताना रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर

रिओ - जगातील सर्वात वेगवान धावपटू, अविश्वसनीय अ‍ॅथलिट आणि स्वत:ला ‘दिग्गज’ संबोधणारा जमैकाच्या युसेन बोल्टने आपले स्वप्न पूर्ण करताना रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावत कारकिर्दीला सोनेरी रामराम केला आहे.रिओ आॅलिम्पिक सुरु होण्यापूर्वी बोल्टने म्हंटले होते की, तो आपल्या शेवटच्या आॅलिम्पिकमध्ये ‘स्प्रिंट स्वीप’ करण्याचे त्याचे स्वप्न आहे. बोल्टने येथे १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय ४00 रिलेचे सुवर्णपदक जिंकले आहे. या तिन्ही शर्यतीत बीजींग आणि लंडन आॅलिम्पिकनंतर सलग तिसऱ्यांदा आॅलिम्पिक हॅटट्रीक आहे. दोन दिवसापूर्वीच वयाची तिशी गाठलेल्या बोल्टचे हे सलग तिसरे आणि एकूण नववे सुवर्णपदक आहे. जगातील सर्वात वेगवान पुरुष अशी उपाधी मिळवलेल्या बोल्टने जमैकाचे नेतृत्त्व करताना ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जमैका संघाने ३७.२७ सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. धावपट्टीचा बादशहा बोल्टने आपल्या संघासाठी शेवटची धाव घेतली आणि सुवर्णपदक पटकावले.बोल्ट म्हणाला, आता मी दिग्गज आहे, असे मी म्हणू शकतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याने मी आता समाधानी आहे. मी खूप आनंदीत असून स्वत:चा मला अभिमान वाटत आहे. माझ्यावर मोठा दबाव होता.