शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मालिका : आॅस्ट्रेलिया अ ची भारतावर ३ गडी राखून मात

By admin | Updated: September 11, 2016 20:31 IST

सलामीवीर कॅमरून बेनक्रॉफ्टच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने आज काही प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतरही पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघावर ३ गडी राखून मात

ऑनलाइन लोकमतब्रिस्बेन : सलामीवीर कॅमरून बेनक्रॉफ्टच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने आज काही प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतरही पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघावर ३ गडी राखून मात करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.

आॅस्ट्रेलिया संघाने १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या व अखेरच्या दिवशी आज ४ बाद ५९ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी नियमित अंतराने विकेटस् गमावल्या; परंतु बेनक्रॉफ्टने अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने १५१ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ५८ धावा केल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने ७ बाद १६१ धावा करीत विजय मिळवला.

गुलाबी चेंडूने खेळवल्या गेलेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात २३0 धावा करीत आॅस्ट्रेलियाला २२८ धावांत गुंडाळले होते. तथापि, भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १५६ धावाच करू शकला होता. मैदान ओलसर असल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ तीन तास उशिरा सुरू झाला. आॅस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी १00 धावांची गरज होती आणि त्यांचे ४ फलंदाज बाकी होते. त्यांनी ३५.३ षटकांत उर्वरित धावा करीत विजय नोंदवला.

बेनक्रॉफ्टला बीयू वेबस्टर (३0) याने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. वरुण अ‍ॅरोनने वेबस्टरला पायचीत करीत ही भागीदारी भंग केली. त्यानंतर सॅम व्हाईटमन (१४) आणि चॅड सेयर्स (१५) यांच्या उपयुक्त खेळीने आॅस्ट्रेलिया विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४२ धावांत ३ व अ‍ॅरोनने ५२ धावांत २ गडी बाद केले. हार्दिक पांड्या आणि आॅफस्पिनर जयंत यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसरी अनधिकृत कसोटी १५ सप्टेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवली जाईल.

संक्षिप्त धावफलक भारत अ पहिला डाव : २३0 आणि दुसरा डाव १५६.आॅस्ट्रेलिया अ : पहिला डाव २२८ व दुसरा डाव ७ बाद १६१.