शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा सलग तिसरा पराभव

By admin | Updated: September 9, 2015 02:23 IST

भारतीय फुटबॉल संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीच्या लढतीत आशियातील बलाढ्य इराण संघाकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला.

बंगळुरू : भारतीय फुटबॉल संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीच्या लढतीत आशियातील बलाढ्य इराण संघाकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. कांतिवीरा स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात फिफा मानांकनात ४०व्या क्रमांकावर असलेल्या इराण संघाने १५५ वे मानांकन असलेल्या भारतीय संघाविरुद्ध सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखले. इराणचा आघाडी फळीचा अव्वल खेळाडू सरदार अजमूनने (ज्याला मेस्सी संबोधले जाते) २९ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारतीय संघाने इराण संघाच्या खेळाडूंनी केलेले प्रत्येक आक्रमण परतावून लावले. भारताच्या आघाडी फळीतील खेळाडूंनीसुद्धा चांगल्या चाली रचल्या; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. भारताचा कर्णधार सुनील छेत्रीला इराणच्या गोलपासून काही अंतरावर चेंडू ताब्यात मिळाला. त्याने तो जोरात गोलच्या दिशेने मारला. पण चेंडू गोल पोस्टच्या जवळून गेल्यामुळे त्याची संधी हुकली. मध्यंतरापर्यंत इराणकडे १-० गोलची आघाडी होती. विश्रांतीनंतर भारताच्या जैकीचंदला सिंहने चेंडूवर ताबा मिळवून इराणच्या गोलच्या दिशेने गेला. त्याने चेंडू क्रॉस मारला, तेथे जेजेने चेंडूला हेड मारून इराणच्या गोलमध्ये टाकला. पण त्यांच्या गोलरक्षकाने चपळाईने चेंडू अडविला. इराणच्या खेळाडूंनी भारतीय बचाव फळी खिळखिळी केली. त्यांच्या आंद्रानिक तेमोरियनने ४७ व्या, तर मेहदी तारेमीने ५१ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाचा विजय साजरा केला. भारतीय संघ अजूनपर्यंत गुणांचे आपले खाते उघडू शकला नाही. ८ आॅक्टोबर रोजी त्यांचा पुढील सामना तुर्कमेनिस्तानविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)