शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंगवर दबाव नाही...

By admin | Updated: August 4, 2016 03:59 IST

‘‘डोपिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेनेही आॅलिम्पिक प्रवेशासाठी परवानगी दिल्यानंतर नरसिंग यादव ‘टेन्शन फ्री’ झाला

रोहित नाईक,मुंबई- ‘‘डोपिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेनेही आॅलिम्पिक प्रवेशासाठी परवानगी दिल्यानंतर नरसिंग यादव ‘टेन्शन फ्री’ झाला असून त्याचा जोमाने सराव सुरू आहे,’’ अशा शब्दांत नरसिंगचे प्रशिक्षक जगमल सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी नरसिंग सध्या कांदिवलीतील भारतीय क्रीडा प्रधिकारणामध्ये (साई) सराव करीत असून त्याच्या तयारीबाबत जगमल यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. शिवाय सरावावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला प्रसारमाध्यमांपासून ८-१० दिवस दूर राहण्याची ताकीदही मिळाली असल्याचे जगमल यांनी सांगितले.जगमल यांनी सांगितले, ‘‘नरसिंगला जागतिक कुस्ती संघटनेकडून परवानगी मिळाली असली, तरी रिओला जाण्याची तारीख अजून ठरलेली नाही. अजूनही राष्ट्रीय संघटनेकडून दिल्लीला बोलावणे आलेले नसल्याने, तोपर्यंत नरसिंग कांदिवलीमध्येच सराव करेल. घरचे केंद्र असल्याने येथे नरसिंगला सरावासाठी कोणतीही अडचण येत नाही. शिवाय त्याला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यापासून आणि कोणालाही भेटण्यापासून मनाई करण्यात आली आहे.’’‘‘नरसिंगवरील सर्व दबाव आता निघून गेला असून तो टेन्शन फ्री आहे. त्यामुळेच त्याचे आता सर्व लक्ष सरावावर केंद्रित झाले आहे. दिवसातून दोन वेळा कसून सराव करीत असून पौष्टिक आहार घेत आहे. सध्या तो मानसिकरीत्या तणावमुक्त आहे. त्यामुळेच १९ आॅगस्टला रिओमध्ये होणाऱ्या फाईटमध्ये तो चांगली लढत देईल आणि एकूणच देशासाठी नक्कीच पदक घेऊन येईल,’’ असा विश्वासही जगमल यांनी या वेळी व्यक्त केला. सुशील दररोज दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी तीन ते साडेतीन तासांचा सराव करतो. यामध्ये कधी कधी वेळेत बदलही होतो, अशी माहितीही जगमल यांनी दिली.>सुशीलकुमारने दिलेल्या शुभेच्छांबाबत नरसिंगने अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कोणीही शुभेच्छा देणे चांगली बाब असते. देशाला पदक मिळवून देण्यासाठी सुशीलने शुभेच्छा दिल्या आहेत आणि नरसिंग यामध्ये नक्कीच यशस्वी होईल.- जगमल सिंग