शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल दहामध्ये कायम राहण्याचे लक्ष्य : बोपन्ना

By admin | Updated: February 20, 2016 02:35 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाच्या जोडीदाराविषयीच्या चर्चेदरम्यानच भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना याने जूनमध्ये होणाऱ्या फ्रेंच ओपनपर्यंत रँकिंगमध्ये टॉप-१0 मध्ये राहणे

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाच्या जोडीदाराविषयीच्या चर्चेदरम्यानच भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना याने जूनमध्ये होणाऱ्या फ्रेंच ओपनपर्यंत रँकिंगमध्ये टॉप-१0 मध्ये राहणे हे आपले लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले आहे.लिएंडर पेस याने याआधीच सानियाचा आपण आदर्श जोडीदार असू, असे स्पष्ट केले होते. याविषयी बोपन्ना म्हणाला, ‘‘मी रियोआधी सर्वच स्पर्धा खेळणार आहे. त्यात दुबई, इंडियन वेल्स, माँटे कार्लो, रोम आणि फ्रेंच ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. माझे लक्ष्य हे फ्रेंच ओपनपर्यंत अव्वल दहामध्ये राहणे हे आहे. त्यानंतर दुहेरी व मिश्र दुहेरीत कोण कोणाचा जोडीदार आहे हे पाहता येईल. रिओला अजून खूप वेळ बाकी आहे.’’रिओ आॅलिम्पिकचे क्वॉलिफिकेशन ६ जूनला येणाऱ्या रँकिंगवर अवलंबून असेल. तसेच फ्रेंच ओपन १६ मे ते ५ जूनदरम्यान होणार आहे. जोडीदाराविषयी अंदाज लावणे अशक्य असल्याचे बोपन्नाने म्हटले.दुहेरी रँकिंगमध्ये ५२ व्या स्थानावर घसरलेल्या पेसने बोपन्ना याने आॅलिम्पिकआधी आपल्यासोबत खेळण्यास नकार दिल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर बोपन्ना आपला सध्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जियासोबत खेळून खूश आहोत असे सांगितले.बोपन्ना म्हणाला, ‘‘पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन वेल्स स्पर्धेसाठी संयुक्त रँकिंग ५0 असायला हवी. त्यामुळे मी लिएंडरसोबत खेळू शकत नाही. प्रत्येकाला फ्रेंच ओपनआधी आपले गुण वाचवावे लागतील आणि मी तेच करीत आहे. आॅलिम्पिकआधी अनेक समीकरणे बनतील. रिओेत जाण्यासाठी पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत पात्र ठरावे लागणार आहे याचे आपल्याला भान ठेवावे लागेल. मार्ग अजून खूप दूर आहे.’’विशेष म्हणजे लंडन आॅलिम्पिकप्रमाणेच भारत दोन पुरुष दुहेरीचा संघ उतरवणार का याविषयी निश्चित झालेले नाही. त्यातच भारताला मिश्र दुहेरीत पदकाची आशा आहे आणि भारताकडे मिश्र दुहेरीसाठी जगातील नंबर वन खेळाडू सानिया मिर्झा संघात असणार आहे.(वृत्तसंस्था)