खार जिमखान्यात रंगणार टेबल टेनिस

By Admin | Updated: August 16, 2016 00:31 IST2016-08-16T00:31:58+5:302016-08-16T00:31:58+5:30

तिसरी मुंबई आंतर कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धा २० आणि २१ आॅगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. खार जिमखान्यात होणाऱ्या स्पर्धेत शहरातील नामांकित संघासह तब्बल

Table Tennis at the Khar Gymkhana | खार जिमखान्यात रंगणार टेबल टेनिस

खार जिमखान्यात रंगणार टेबल टेनिस

मुंबई : तिसरी मुंबई आंतर कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धा २० आणि २१ आॅगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. खार जिमखान्यात होणाऱ्या स्पर्धेत शहरातील नामांकित संघासह तब्बल १६ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. त्याचबरोबर जिमखान्यात या कालावधीत खुली टेबल टेनिस स्पर्धादेखील पार पडणार आहे.
कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ खेळाडूंना एका संघात स्थान देण्यात येईल. स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे ४ ग्रुप बनवण्यात येणार आहे. लीग पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात ‘बेस्ट आॅफ थ्री’नुसार बाद फेरीसाठी संघ पात्र ठरेल.
प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ पुढील फेरीसाठी निवडण्यात येणार आहेत. खुल्या स्पर्धेत पुरुष, महिला आणि वेटरर्न (४० वर्षांवरील) एकेरी आणि दुहेरी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटातील स्पर्धेसाठी ६३ प्रवेशिकांची नोंद झाल्याचे आयोजकांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Table Tennis at the Khar Gymkhana