शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक यादीत सुशील कायम

By admin | Updated: May 13, 2016 03:24 IST

रिओ आॅलिम्पिकसाठी भारतीय कुस्ती महासंघाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे पाठविलेल्या मल्लांच्या यादीतून सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताचा कुस्ती महासंघाने इन्कार केला

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकसाठी भारतीय कुस्ती महासंघाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे पाठविलेल्या मल्लांच्या यादीतून सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताचा कुस्ती महासंघाने इन्कार केला. दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकणारा सुशील अद्याप रेस मध्ये कायम असल्याचा महासंघाने दावा केला आहे.आपल्या गटात आॅलिम्पिक पात्रता गाठणाऱ्या मल्लाचे नाव देशाच्या आॅलिम्पिक संघटनेकडे पाठविण्याची विश्वकुस्तीत परंपरा असल्याची स्पष्टोक्ती महासंघाने दिली. सुशीलचे नाव यादीत नाही त्यामुळे तो रिओला जाणार नाही, असे गृहित धरू नये. अध्यक्ष ब्रिजभूषणसिंग सरन हे चाचणी घ्यायची की नाही, याचा निर्णय घेतील. महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर म्हणाले, ‘संभाव्य मल्लांची यादी आम्ही नव्हे, तर विश्वकुस्ती महासंघाने पाठविली आहे. आपापल्या वजन गटात पात्र ठरलेल्या मल्लांची यादी पाठविण्याची परंपरा आहे.’७४ किलो फ्री स्टाइल प्रकारात आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल, याचे थेट उत्तर विनोद यांनी दिले नाही. ते म्हणाले, ‘यासाठी चाचणीचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. सुशीलच्या जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय झालेला नाही. ’नरसिंगने गतवर्षी लॉस वेगास येथे विश्व चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलो वजन प्रकारात कांस्य जिंकून कोटा मिळविला होता. तेव्हापासून तो रिओसाठी दावा करीत आहे. माजी विश्व चॅम्पियन सुशीलने यासाठी चाचणी घेण्याची मागणी केली. सुशीलने ६६ किलो वजन प्रकारात बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. विश्व महासंघाने वजन गटात बदल केल्यानंतर सुशील ७४ किलो गटात खेळेल. नरसिंग हा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ७४ किलो फ्री स्टाइल प्रकारात खेळला होता. (वृत्तसंस्था)