...तर सुशीलची न्यायालयात धाव

By Admin | Updated: May 15, 2016 04:28 IST2016-05-15T04:28:42+5:302016-05-15T04:28:42+5:30

दोन वेळा आॅलिम्पिक पदक पटकाविणारा कुस्तीपटू सुशील कुमार सलग चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

... but Sushil is in court | ...तर सुशीलची न्यायालयात धाव

...तर सुशीलची न्यायालयात धाव

नवी दिल्ली : दोन वेळा आॅलिम्पिक पदक पटकाविणारा कुस्तीपटू सुशील कुमार सलग चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, नरसिंह पंचम यादव याच्याविरुद्ध ट्रायल करण्यासाठी त्याने मागणी केली आहे.
ही मागणी भारतीय कुस्ती महासंघटनेने डावलली तर सुशील न्यायालयात धाव घेईल, असा इशारा त्याने दिला आहे. सुशीलने हा विषय पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवला आहे. मात्र, सरकारकडून आतापर्यंत कोणतेही उत्तर आलेले नाही.
सुशीलचे सल्लागार सतपाल सिंह एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, की आम्ही आतापर्यंत उत्तराची प्रतीक्षा करीत आहोत. सुशीलने पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती. आशा आहे की, सुशीलच्या अपिलाचे उत्तर मिळेल. तो ट्रायलला बोलाविण्याची आशा करीत असून त्याला न्यायालयात जायचे नाही.
मात्र, हे प्रकरण निपटत नसेल तर त्याच्याकडे न्यायालयात धाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. सुशीलने पंतप्रधान, आयओए, क्रीडा मंत्रालय, भारतीय कुस्ती महासंघ आणि समर्थकांना अपील केले आहे, की त्याला रिओ आॅलिम्पिक ट्रायलसाठी संधी देण्यात यायला हवी.
(वृत्तसंस्था)

Web Title: ... but Sushil is in court