शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सूर गवसला

By admin | Updated: February 11, 2015 01:42 IST

रोहित शर्माच्या (१५० धावा, १२२ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार) शतकी खेळीच्या जोरावर गतचॅम्पियन भारताने विश्वकप स्पर्धेपूर्वी सूर

अ‍ॅडिलेड : रोहित शर्माच्या (१५० धावा, १२२ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार) शतकी खेळीच्या जोरावर गतचॅम्पियन भारताने विश्वकप स्पर्धेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना मंगळवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कमकुवत अफगाणिस्तानवर १५३ धावांनी विजय मिळविला. भारताने ३६४ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी अफगाणिस्तानचा डाव ८ बाद २११ धावांत रोखला. विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारीला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी टीम इंडियाला विजयाच्या ‘टॉनिक’ची गरज होती. अफगाणिस्तानसारख्या तुलनेने कमकुवत असलेल्या संघाविरुद्ध भारताने दमदार विजय मिळवीत आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयाचे खाते उघडले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारताने ५० षटकांत ५ बाद ३६४ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी अफगाणिस्तानचा डाव ८ बाद २११ धावांत रोखला. भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियात प्रथमच अचूक मारा केला. रोहितच्या आक्रमक शतकी खेळीव्यतिरिक्त डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने ७५ धावांची आक्रमक खेळी केली. अजिंक्य रहाणेने नाबाद ८८ धावा फटकावीत भारताला दमदार मजल मारून दिली. भारतीय फलंदाजांनी या लढतीत चांगला सराव केला. पण, स्टार फलंदाज विराट कोहली केवळ ५ धावा काढून बाद झाला. कोहलीचे अपयश टीम इंडियासाठी अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतीय गोलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचा लाभ घेताना अचूक मारा केला व अफगाणिस्तानचा डाव माफक धावसंख्येत रोखला. वेगवान गोलंदाज मोहित शर्मा व डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे ४० व ३८ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. उमेश यादव, रवीचंद्रन आश्विन व रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.