शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर 22 धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: May 25, 2016 23:43 IST

इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर राऊंडमध्ये सनरायझर्स हैदराबादनं केकेआरवर 22 धावांनी दणदणीत विजय मिळवला

 ऑनलाइन लोकमत

दिल्ली, दि. 25- इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर राऊंडमध्ये सनरायझर्स हैदराबादनं केकेआरवर  22 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादनं उभा केलेला 163 धावांचा डोंगर पार करताना केकेआरची पुरती दमछाक उडाली आहे. केकेआरचा कॅप्टन गंभीरलाही फार काही चमक दाखवता आली नाही. उथप्पा 11, मुरनो 16, पांड्या 36, पठाण 2, यादव 23, सतीश 8, होल्डर 6 धावा काढून तंबूत परतले आहेत. 
तत्पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सनं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबादनं चांगली खेळी करत 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून युवराज सिंगनं चमकदार कामगिरी करत 8 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली. तर कॅप्टन वॉर्नर 28, धवन 10, हेनरिक 31, हूडा 21, ओझा 7, कुमार 1 धावा काढून तंबूत परतले आहे. शर्मा आणि सरण अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहिले होते. शर्मानं नाबाद राहत 14 धावा केल्यात. तर केकेआरकडून भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुलदीप यादवनं हेनरिक, वॉर्नर आणि कटिंगला तंबूत परत पाठवले. मॉर्केलनं 2 आणि होल्डर दोन बळी मिळवले.  
गुणतालिकेत सुरुवातीच्या काळात अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला गेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. आता सनरायझर्स हैदराबादनं एलिमिनेटर लढतीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे.