स्क्वॉशने उंची गाठली

By Admin | Updated: December 18, 2014 09:13 IST2014-12-18T05:12:16+5:302014-12-18T09:13:42+5:30

भारतीय स्क्वॉशसाठी सरते वर्ष हे अभूतपूर्व उंची गाठणारे ठरले. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक नोंद केली.

Squash reached high | स्क्वॉशने उंची गाठली

स्क्वॉशने उंची गाठली

भारतीय स्क्वॉशसाठी सरते वर्ष हे अभूतपूर्व उंची गाठणारे ठरले. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक नोंद केली. दीपिका पल्लीकल, जोशना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांनी कामगिरीत सातत्य राखून पदकांची लयलूट केली असली तरी हरिंदर पाल संधू याच्याच नावाचा बोलबाला राहिला. राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि जोशना या जोडीने महिला सांघिक गटात सुवर्ण जिंकले. आशियाई स्पर्धेत पदकांमध्ये वाढ झाली. सौरव घोषाल, कुश कुमार, महेश माणगावकर व हरिंदर पाल संधू या चौकडीने पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले, तर पुरुष एकेरी सौरव आणि महिला सांघिक गटात भारताला रौप्य पटकावण्यात यश आले. महिला एकेरी दीपिकाला कांस्यवर समाधान मानावे लागले.
भारताने आशियाई स्पर्धेत चारही गटांत पदकांची लयलूट केली. हे वर्ष राष्ट्रकुल स्पर्धेला समर्पित करत असल्याची प्रतिक्रीया घोषालने दिली. महिला गटात दीपिका, चिनप्पा आणि अनाका अलांकामोनी यांनी भारताला पहिला रौप्य पदक जिंकवून दिला. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीत चिनप्पाचा पराभव करून कांस्यपदकही पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत या जोडीने भारताला पहिले पदक आणि तेही सुवर्ण पटकावून दिले.

Web Title: Squash reached high